नवी दिल्ली: कोरोना विषाणूंचा प्रादूर्भाव वेगाने वाढत आहे. या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने भारतीय पारंपरिक औषध पद्धतींच्या आधारे प्रतिबंधात्मक सूचना जारी केल्या आहेत.
- व्यक्तिगत स्वच्छता सांभाळणे गरजेचे.
- साबण पाण्याने आपले हात किमान 20 सेकंदपर्यंत धुवावेत.
- शडांग पनिया या प्रकियेने बनवलेला काढा एका बादलीत भरून ठेऊन तो तहान लागली असता प्यावा. (मुष्ट, परपट, उशीर, चंदन, उदीच्च आणि नागर यांच्या भूकटीचा एक लिटर पाण्यात वापर करून ते निम्मे होईपर्यंत उकळावे, म्हणजे ही प्रक्रिया पूर्ण होते. )
- हात न धुता आपल्या डोळे, नाक आणि तोंडालगत हात लावू नये.
- आजारी माणसांचा संसर्ग टाळावा.
- आजारपणात घरातच रहावे.
- खोकला किंवा शिंका आल्या असतांना तोंड कपड्याने झाकावे, नंतर हात स्वच्छ धुवावेत.
- ज्या वस्तूंना स्पर्श झाला आहे त्या वस्तू साफ कराव्यात.
- प्रवासात किंवा कामकाजाच्या ठिकाणी एन 95 हा मास्क वापरणे सोयीचे ठरेल.
- कोरोना विषाणू संसर्ग झाल्याचा संशय आल्यास ताबडतोब मास्क लावणे सुरू करावे आणि जवळच्या रुग्णालयाशी संपर्क साधावा.
- आरोग्य व आहार आणि योग्य जीवनपद्धती यामुळे रोगप्रतिबंधकारक क्षमता वाढते.
- दिवसातून दोन वेळेला कोमट पाण्याबरोबर 5 ग्रॅम अगस्त्य हरितकी घ्यावी.
ही सर्व माहिती केवळ उपयुक्त माहिती म्हणून दिली आहे. तिचा वापर करण्यासाठी नोंदणीकृत आयुर्वेद वैद्यांकडून योग्य तो सल्ला घ्यावा. आयुष मंत्रालयाच्या सांगण्यानुसार 28 जानेवारी रोजी झालेल्या होमिओपॅथी विषयक केंद्रीय होमिओपॅथी संशोधन परिषदेच्या वैज्ञानिक सल्लागार मंडळाच्या बैठकीत कोरोना विषाणूचा संसर्ग टाळण्यासाठी उपाययोजनेचा विचार करण्यात आला. तज्ञ गटाने आरसेनिकम अल्बमकिस या होमिओपॅथी औषधाचा वापर याकामी होऊ शकतो असे म्हटले आहे. कोरोना विषाणूंच्या संसर्गावर युनानी पद्धतीच्या उपचारांचे नियोजनही करण्यात आले आहे.
Published on: 01 February 2020, 03:45 IST