पैठणच्या तालुक्यातील हर्षी येथील एका तरुण शेतकऱ्याने शिमला मिरचीच्या पिकाचा यशस्वी प्रयोग केला आहे. यामुळे या शेतकऱ्यांचे कौतुक केले जात आहे. 40 गुंठे जमिनीमध्ये शिमला मिरचीची लागवड केली. तर केवळ एक एकर क्षेत्रावर या तरुण शेतकऱ्याने शिमला मिरचीची लागवड करून आतापर्यंत पाच टन उत्पादन घेतले आहे.
आतापर्यंत सुमारे दोन लाख रुपयांचे उत्पन्न अवघ्या एकरभर क्षेत्रातून त्यांच्या पदरात पडले आहे. कृष्णा आगळे असे या शेतकऱ्याचं नाव आहे.त्यांना दहा एकर शेती आहे. शेतातील पाणी अल्पप्रमाणात होते. त्यामुळे पाण्याअभावी उत्पन्न खूपच कमी होत होते. गत दोन-तीन वर्षांपासून पावसाचे पाणी अनियमितता त्यामुळे खर्च जास्त उत्पन्न कमी होत होते.
त्यामुळे काही तरी नवीन प्रयोग करून शेती करावी, असा आगळे यांनी विचार केला. आगामी काळात 18 ते 20 टन शिमला मिरचीचे उत्पादन त्यांना अजून अपेक्षित आहे. शेतीमध्ये नवनवीन प्रयोग करत असताना शिमला मिरचीचं प्रयोग यशस्वी ठरला असून, यात आई-वडील यांच्यासह पत्नीची मदत मिळाली असल्याचा कृष्णा म्हणाले.
किवीची शेती आहे खूपच फादेशीर, नापीक जमिनीतून हा शेतकरी लाखो रुपये कमावतोय
तीस रुपये किलोपर्यंतचा दर मिळाल्याने शिमला मिरचीचे दीड लाख रुपयेपेक्षा अधिकचे उत्पन्न आतापर्यंत प्राप्त झाले आहे. हा दर कायम राहिला किंवा त्यापेक्षा दर काही प्रमाणात कमीही झाला तरी एक एकर क्षेत्रातून सहा लाख रुपयांपेक्षा अधिकचे उत्पन्न प्रयोगशील शेतीमुळे मिळणार आहे.
शेतकऱ्यांनो बजारात आलीत बनावट खते, अशा प्रकारे ओळख खरी खते..
संभाजीनगर जिल्ह्यातील शेतकरी गेल्या चार वर्षांपासून अतिवृष्टीचा सामना करतोय. आधीच पारंपारिक पिकांना योग्य भाव मिळत नाही आणि त्यातच अतिवृष्टीमुळे शेत्कात्यांची आर्थिक परिस्थिती बेताची झाली आहे. यामुळे शेतकरी इतर प्रयोग करत आहेत.
आता पीक कर्जासाठी 'सिबिल स्कोअर' मागणाऱ्या बँकांवर फौजदारी गुन्हा दाखल होणार
यावर्षीचा पाऊसकाळ कसा असणार? जाणून घ्या, भारतीय हवामान खात्याने दिली महत्वाची माहिती...
शेतकऱ्यांना केवळ 1 रूपयात मिळणार पीकविमा, जाणून घ्या...
Published on: 10 May 2023, 01:11 IST