News

शिमला मिरची हे पीक थंड हंगामातील पीक आहे, परंतु पॉलीहाऊसचा वापर करून रंगीत ढोबळी मिरचीची लागवड वर्षभर केली जाते.व्हिटॅमिन के , व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन ए, कॅरोटीनोइड्स आणि फायबर सिमला मिरचीमध्ये मुबलक प्रमाणात आढळतात. याचे सेवन केल्याने शरीर निरोगी आणि तंदुरुस्त राहते. हिरवी शिमला मिरची हे अँटी-ऑक्सिडंटचे उत्तम माध्यम आहे. हे लाल, जांभळे, केशरी आणि पिवळे रंग देखील आहे. सर्वांमध्ये पोषक आणि जीवनसत्त्वे मुबलक प्रमाणात आढळतात.

Updated on 04 November, 2023 4:48 PM IST

शिमला मिरची हे पीक थंड हंगामातील पीक आहे, परंतु पॉलीहाऊसचा वापर करून रंगीत ढोबळी मिरचीची लागवड वर्षभर केली जाते.व्हिटॅमिन के , व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन ए, कॅरोटीनोइड्स आणि फायबर सिमला मिरचीमध्ये मुबलक प्रमाणात आढळतात. याचे सेवन केल्याने शरीर निरोगी आणि तंदुरुस्त राहते. हिरवी शिमला मिरची हे अँटी-ऑक्सिडंटचे उत्तम माध्यम आहे. हे लाल, जांभळे, केशरी आणि पिवळे रंग देखील आहे. सर्वांमध्ये पोषक आणि जीवनसत्त्वे मुबलक प्रमाणात आढळतात.

जमीन व हंगाम -
ढोबळया मिरचीची लागवड ऑगस्‍ट, सप्‍टेबर महिन्‍यात करतात. त्‍यामुळे फळांची काढणी जानेवारी, फेब्रूवारी या कालावधीत करता येते. जमिनीचा सामु 6 ते 7 च्‍या दरम्‍यान असावा.

लागवड -
रोपे तयार करताना 3 मीटर चे गादी वाफे तयार करून त्यात बी पेरावे. रोपे 45 दिवसात पुर्नलागवडीसाठी तयार होतात. रोपी सरीच्या दोन्ही बाजून 30 सें.मी.अंतरावर लावावे व पुर्नलागवड झाल्यावर पाणी दयावे. ठिबक सिंचनाव्दारेही पिकांना पाणी चांगल्या प्रकारे देता येते.

सुधारित जाती -
इंद्रा कॅप्सिकम -
शिमला मिरचीची ही सुधारीत जात आहे. या जातीची शिमला मिरचीचे झाडे मध्यम उंच, वेगाने वाढणारे असतात. या झाडाची पाने गडद हिरवी आणि दाट असतात. या जातीची सिमला मिरची गडद हिरवी, जाड आणि चमकदार असते. या जातीपासून चांगले उत्पादन मिळते.या जातीची लागवड केल्यानंतर 70-80 दिवसांत शिमला मिरची काढणीसाठी तयार होत असते.

ऑरबेली -
या फळांचा रंग पिवळा होतो. पूर्ण वाढ झाल्यावर झाडाची उंची 10 फुटांपर्यंत असते. फळाची साल मध्यम जाडीची असून सरासरी 150-180 ग्रॅम फळाचे वजन असते. उत्तम व्यवस्थापन असण्यास 5 ते 8 किलो प्रतिझाड उत्पादन मिळते.

इंडिया कॅप्सिकम-                                                                                                                                                        ही जात झपाट्याने वाढणारी जात आहे. या जातीचा शिमला मिरचीचा रंग गडद हिरवा असतो. जून ते डिसेंबर पर्यंतचे हवामान या जातीच्या शिमला मिरची साठी अनुकूल असतो. या जातीची शिमला मिरची लागवड केल्यानंतर सुमारे 90 ते 100 दिवसांनी उत्पादन देण्यास तयार होत असते.

 

कॅलिफोर्निया वंडर कॅप्सिकम -                                                                                                                                           ही भारतातील सुधारित जातींपैकी एक मानली जाते. या जातीच्या शिमला मिरचीचे झाडे मध्यम उंचीची असून फळांचा म्हणजेचं सिमलाचा रंग हिरवा असतो. लावणीनंतर सुमारे 75 दिवसांनी त्याची काढणी करता येते.

ब्राइट स्टार -
ही संकरित जात असून फळे पिवळ्या रंगाची असतात. पहिली फळाची काढणी 80-90 दिवसांनी चालू होते.

यलो वंडर -                                                                                                                                                             शिमला मिरचीची ही देखील एक प्रगत जात आहे. सिमला मिरचीचा या जातीच्या झाडाची उंची मध्यम आकाराची असून त्याची पाने रुंद असतात. सिमला मिरचीची ही जात लागवड केल्यानंतर सुमारे 70 दिवसांनी तयार होते. या जातीपासून प्रति एकर सुमारे 48 ते 56 क्विंटल सिमला मिरचीचे उत्पादन मिळत असल्याचा दावा केला जातो.

रोग व किड
मर –
या रोगामध्‍ये शेंडयाखालील भाग वाळत जातो. रोगग्रस्‍त झाडे समुळ नष्‍ट करावी लागतात.
या रोगाच्या नियंत्रणासाठी झाडांच्‍या मुळाजवळ 0.6 टक्‍के बोर्डो मिश्रण टाकावे.

माव्‍याच्‍या किड -
या रोगामुळे पाने आखडून झाडांची वाढ खुंटते. झाडांना फूले येत नाहीत आणि उत्‍पन्‍नावर विपरीत परिणाम होतो. रोगग्रस्‍त झाडे समुळ उपटून नष्‍ट करावीत. या रोगाच्या नियंत्रणासाठी 1 किलो मोनोक्रोटोफॉस प्रति लिटर पाण्‍यात या प्रमाणात घेऊन झाडांवर दर 15 दिवसांचे अंतराने नेहमी फवारणी करावी.

 

English Summary: Capsicum Cultivation Methods and Improved Varieties
Published on: 04 November 2023, 04:48 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)