News

राज्यात पीक परिस्थिती सह पाऊसही सर्वसाधारण असणार.

Updated on 04 May, 2022 7:30 PM IST

राज्यात पीक परिस्थिती सह पाऊसही सर्वसाधारण असणार.

अँकर- पीक परिस्थिती, पाऊस पाणी, त्याच बरोबर सामाजिक, आर्थिक आणि राजकीय परिस्थितीचा अंदाज सांगणारी आणि विदर्भासह संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध असलेले बुलडाणा जिल्ह्यातील जळगाव जामोद तालुक्यातील भेंडवळ येथील घटमांडणीच्या माध्यमातून केली जाणारी भविष्यवाणी आज जाहीर करण्यात आलीय.

व्हीवो - शेतात खड्डा, खड्ड्यात मातीचा घट , घटात पाणी व त्यावर कुरडया ,त्याच्या बाजूला पान सुपारी व विविध १८ प्रकारची कडधान्ये. अशा या ‘घटमांडणी’तून वर्षभराचा हंगाम ,पीक पाऊस अर्थव्यवस्था ,संरक्षण व्यवस्था व राजकीय घडामोडीचे भाकित या घटमांडणीतून केले जाते.

आज बुलडाणा जिल्ह्यातील भेंडवळ परिसरातील शेतकरी दावा करतात की ३५० वर्षांपुर्विपासून अक्षयतृतीयेला ही प्रथा जोपासली जाते, या भविष्यवाणी कडे सर्वांचेच लक्ष लागून असते.या मांडणीतून जाहीर केलेल्या अंदाजाबद्दल शेतकऱ्यांमध्ये मोठी उत्सुकता असते. चंद्रभान महाराज यांचे वंशज पुंजाजी महाराज आणि सारंगधर महाराज यांनी निरीक्षणे करून हा अंदाज जाहीर केलाय. 

हे ही वाचा - स्फुरद (फॉस्फरस) ची ही महत्वाची कार्य आपल्याला महिती आहेत का?

 

व्हीवो - गेल्या वर्षी देशावर कोरोना सारख्या भयंकर रोगाने आक्रमण केलं होत, येणाऱ्या वर्षभरात नेमकी पावसाची ,पिकांची , देशातील राजकीय स्थिती काय असणार आहे हे या अंदाजानुसार जाणून घेऊ यात.

हे अंदाज किती खरे ठरतात यावर शंका असली व या प्रथेला वैज्ञानिक आधार नसला तरी मात्र शेतकरी यावर मोठा विस्वास ठेऊन आपल्या वर्षभराच शेतीविषयक नियोजन या प्रथेनुसारच करतात. या वर्षभरासाठीचे भेंडवळ घट मंडणीतील आज जाहीर करण्यात आलेले अंदाज.

पीक पाण्याचा अंदाज

कापूस , उडीद , ज्वारी , हरभरा ही पिके चांगली येतील व भाव ही चांगला मिळेल , तर वाटाणा , बाजरी , गहू, करडई ही पिके मध्यम स्वरूपात येतील, देशात पीक चांगले येईल.मात्र पिकांना भाव मिळणार नाही. असा अंदाज करण्यात आलाय. 

राजकीय भाकीत

राजा कायम असणार म्हणजे देशात सत्ता पालट होणार नाही, देशाचं संरक्षण चांगलं राहील, परंतु देश आर्थिक अडचणीत असेल, असही सांगण्यात आलंय.

पाऊसाचा सर्वसाधारण अंदाज

पावसाळ्यात जून महिन्यात कमी पाऊस ,जुलै महिन्यात साधारण पाऊस तर ऑगस्ट व सप्टेंबर महिन्यात चांगला पाऊस असणार आहे, अवकाळी पाऊस वर्षभर राहणार आहे.

आरोग्य विषयक

तर गेल्या वर्षीप्रमाणे देशात व राज्यात आलेली रोगराई यावर्षी नसणार आहे.असाही अंदाज करण्यात आलाय.

English Summary: Capital predictions announced, know political, agricultural, rain and health predictions
Published on: 04 May 2022, 05:43 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)