News

यावर्षी अतिरिक्त उसाचा प्रश्न हा उग्र रूप धारण करीत आहे. त्यामुळे साखर कारखान्यांच्या कार्यक्षेत्रातील उसाचे नोंदणी झालेली आहे व ज्या उसाची नोंदणी झालेली नाही असे संपूर्ण उसाचे गाळप पूर्ण झाल्याशिवाय साखर कारखाने बंद करता येणार नाहीत असे आदेश राज्याचे साखर आयुक्त शेखर गायकवाड यांनी राज्यातील कारखानदारांना दिले आहेत.

Updated on 11 February, 2022 10:18 AM IST

यावर्षी अतिरिक्त उसाचा प्रश्न हा उग्र रूप धारण करीत आहे. त्यामुळे साखर कारखान्यांच्या कार्यक्षेत्रातील उसाचे नोंदणी झालेली आहे व ज्या उसाची नोंदणी झालेली नाही असे संपूर्ण उसाचे गाळप पूर्ण झाल्याशिवाय साखर कारखाने बंद करता येणार नाहीत असे आदेश राज्याचे साखर आयुक्त शेखर गायकवाड यांनी राज्यातील कारखानदारांना दिले आहेत.

अतिरिक्त उसाचा प्रश्न इतर जिल्ह्यांमध्ये ज्याप्रमाणे आहे तसाच तो बीड जिल्ह्यामध्ये देखील आहे. बीड जिल्ह्यातील ऊस या हंगामात साखर कारखाना पर्यंत पोहोचेल की नाही असा प्रश्न निर्माण झाला आहे. मागच्या दोन वर्षापासून चांगला होत असल्याने पाण्याची उपलब्धता वाढली व त्याचा परिणाम उसाची लागवड मोठ्या प्रमाणात झाल्याची पाहायला मिळाली. त्यामध्येच काही तांत्रिक अडचणींमुळे राज्यातील बरेच साखर कारखाने खूप उशिरा सुरू झाले. त्यामुळे अशा कारखान्याच्या कार्यक्षेत्रातील ऊस साखर कारखान्यात पर्यंत गाळप बंद होई पर्यंत पोहोचेल का अशी चिंता ऊस उत्पादक शेतकऱ्यांना लागली आहे.

साखर आयुक्तांच्या पत्रातील महत्त्वाचे मुद्दे

  • 15 ऑक्टोबर 2021 पासून कारखान्यांना गाळपाची परवानगी दिली व त्यानुसार राज्यात 197 कारखान्यांनी गाळप हंगाम सुरू केला.
  • एका प्राथमिक अंदाजानुसार एकूण 12.32 लाख हेक्टर क्षेत्रावरील चालू हंगामात ऊस उपलब्ध आहे.
  • सगळे ऊस उत्पादक शेतकरी वंचित राहणार नाहीत याची सर्व साखर कारखान्यांनी दक्षता घ्यावी.
  • एखाद्या साखर कारखान्याकडे अतिरिक्त ऊस शिल्लक राहात असल्यासनजीकच्या साखर कारखान्यांना अतिरिक्त होणारा संपूर्ण ऊस गाळप करण्याबाबत सुचवावे.
  • गाळप हंगाम बंद होण्याचे 15 दिवस आधीस्थानिक वृत्तपत्रातून जाहीर प्रगटन द्यावे.
  • विनापरवानगी कारखाना बंद केल्यास आणि कार्यक्षेत्रातील ऊस गाळपाविना शिल्लक राहिला तर त्याची जबाबदारी ही साखर कारखान्यावर असेल आणि त्यावर ती गंभीर स्वरूपाची कारवाई केली जाईल असा इशारा सुद्धा साखर आयुक्तांनी दिलाआहे.(स्रोत-एबीपी माझा)
English Summary: cant you shut sugercane cane factory without total cane cutting in area
Published on: 11 February 2022, 10:18 IST