गेल्या अनेक वर्षांपासून शेतकरी बांधवांना शेती करताना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. कधी अतिवृष्टी, कधी अवकाली, कधी ढगाळ वातावरण, कधी गारपीट (Climate Change) यामुळे शेतकऱ्यांना अक्षरशा कवडीमोल उत्पादन मिळत आहे. हे कमी असते की काय म्हणून शेतमालाला देखील कवडीमोल दर मिळतो यामुळे शेतकऱ्यांना शेती मध्ये कायमच तोटा सहन करावा लागत आहे. यामुळे राज्यातील शेतकरी बांधव आता चुकीच्या पद्धतीने आणि कमी कालावधीत अधिकता पैसा कमवण्याचे अनैतिक प्रयत्न करताना बघायला मिळत आहेत.
नुकत्याच काही दिवसांपूर्वी मराठवाड्यात (Marathwada) व पश्चिम महाराष्ट्रात (Western Maharashtra) शेतकरी बांधवांनी कमी कालावधीत अधिक पैसा कमावण्यासाठी गांजाची शेती (Cannabis cultivation) सुरू केली होती. आता पुन्हा एकदा मराठवाड्यात गांजाच्या शेतीचे प्रकरण उघडकीस आले आहे. यामुळे पुन्हा एकदा मराठवाड्यात खळबळ उडाली आहे.
बीड जिल्ह्यातील (Beed) गेवराई तालुक्यात मौजे तलवाडा येथे आता उसाच्या शेतात गांजाची लागवड केली असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. याबाबत पोलिसांना (Maharashtra Police) गुप्त सूत्रांद्वारे माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठले आणि या प्रकरणाचा भंडाफोड केला. पीएसआय यांनी या प्रकरणाचा छेडा लावत 22 किलो गांजा जप्त केला आहे तसेच संबंधित शेतमालक बाळू खवाटे याला देखील अटक केली आहे.
गांजाची लागवड आंतरपीक (Intercropping of cannabis) म्हणून उसाच्या फडात शेतकरी मोठ्या प्रमाणात करत आहेत. उसाच्या शेतात गांजाची लागवड लवकर दिसत नसल्याने शेतकरी उसाच्या फडात गांजाची लागवड करतात. तळवाडे येथील बाळू खवाटे या शेतकऱ्याने देखील गांजाची शेती स्पष्ट दिसू नये या हेतूने उसाच्या पिकात आंतरपीक म्हणून याची लागवड केली होती.
मात्र सध्या उसाची काढणी प्रगतीपथावर असताना तसेच गांज्याचे पीक ऊसापेक्षा अधिक वाढल्याने याबाबत खुलासा झाला आहे. याबाबत पोलिसांना माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि गांजाची झाडे जप्त केली. यामध्ये 18 किलो वजनाची 22 झाडे जप्त करण्यात आले तसेच शेतकरी बाळू खवाटे यांना अटक देखील झाली आहे.
Published on: 19 April 2022, 12:39 IST