सोलापूर : मोहोळ तालुक्यातील टाकळी सिकंदर येथील भीमा सहकारी साखर कारखान्याच्या (Bhima Cooperative Sugar Factory) सभासद यादीतून नावे काढून टाकून कारखाना उपविधीतील तरतुदींची पूर्तता न केलेल्या २१०० सभासदांचे सभासदत्व रद्द करण्याचा आदेश सोलापूर विभागाचे प्रादेशिक सहसंचालक(साखर) राजेंद्रकुमार दराडे यांनी ११ मार्च रोजी दिला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी, भाजपचे मोहोळ तालुकाध्यक्ष सुनील चव्हाण (Sunil Chavan) आणि नानासाहेब पवार (नानासाहेब पवार) यांनी ९ सप्टेंबर २०२१ रोजी प्रादेशिक सहसंचालक साखर राजेंद्र दराडे यांच्याकडे भीमा सहकारी साखर कारखान्याने २४५१ सभासद भीमा कारखान्याला ऊस पुरवठा करत नाहीत, १० गुंठा पेक्षा जास्त क्षेत्रामध्ये ऊस पिकविला नाही, कार्यक्षेत्रामध्ये नाहीत, त्यामुळे ते शेतकरी नसून शेती करीत नाहीत.
मात्र, कारखान्यान राजकीय हेतूने प्रेरित होऊन कारखाना निवडणुकीत उभे राहण्यासाठी व मतदान करण्यासाठी म्हणून हे या सभासदांना ऊस उत्पादक सभासद म्हणून दाखविले आहे. तसेच यातील अनेक सभासदांनी कारखान्याची शेअर्स रक्कमही पूर्ण केली नाही.
महत्त्वाच्या बातम्या :
आनंदाची बातमी ! नवीन ट्रॅक्टर ट्रॉली खरेदीसाठी सरकार देतंय 90 % अनुदान; असा करा अर्ज
मोठी बातमी : बनावट शेतीमालाची विक्री केल्यास आता जेलची हवा खावी लागणार
त्यामुळे या यादीतील व्यक्तींबाबत महाराष्ट्र सहकारी संस्थांचा कायदा कलम ११ नुसार चौकशी करून त्यांची नावे भीमा सहकारी साखर कारखान्याच्या सभासद नोंद वहीतून कमी करण्याची मागणी केली होती .
त्या अर्जावर सभासदांच्या वतीने शिवाजीराव नामदेव चव्हाण व सतीश दत्तात्रय भोसले यांनी लढा देत अॅड. वैभव देशमुख यांनी बाजू मांडली. या अर्जावर प्रादेशिक सहसंचालक साखर कार्यालयात वेगवेगळ्या तारखेस सुनावणी झाली.
Published on: 05 April 2022, 05:03 IST