सोलापूर: हमीभावापेक्षा कमी दराने शेतमाल खरेदी करणाऱ्या व्यापाऱ्यांचा परवाना कृषी उत्पन्न बाजार समितीने रद्द करावा, असे आवाहन सहकार आणि पणन मंत्री सुभाष देशमुख यांनी आज येथे केले. कृषी पणन मंडळाच्या शेतमाल तारण कर्ज योजना आणि ई-नाम योजनेच्या पुरस्कारांचे वितरण सहकार मंत्री सुभाष देशमुख यांच्या हस्ते येथे झाले. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे अध्यक्ष आप्पासाहेब पाटील, धामणगावचे मोहन इंगळे, दोंडाईचाचे नारायण पाटील, आटपाडीचे भाऊसाहेब गायकवाड, उमरेडचे रुपचंद्र कडू आदी उपस्थित होते.
श्री. देशमुख म्हणाले, शेतकऱ्यांना भाव मिळावा यासाठी कृषी उत्पन्न बाजार समितीची स्थापना करण्यात आली. मात्र बाजार समितीच्या माध्यमातून शेतकऱ्यांना योग्य न्याय मिळाला नाही. त्यामुळे बाजार समितीच्या बाबत काही सुधारणा कराव्या लागल्या. शेतकऱ्यांना भाव मिळावा या हेतूने बाजार समितीची सुरुवात झाली. पण काही बाबतीत चुकीच्या प्रथा पडल्या त्या दुरुस्ती करण्यासाठी राज्य शासनाने प्रयत्न सुरु केले आहेत.
राज्यातील जास्तीत जास्त बाजार समित्यांनी ई-नाम योजनेत सहभागी व्हावे, यासाठी राज्य शासनाचे प्रयत्न आहेत. कारण ई-नाम योजनेत सहभागी झाल्यामुळे शेतकऱ्यांना देशभरातील बाजारपेठ खुली झाली आहे. त्यामुळे स्पर्धा होऊन शेतकऱ्यांना चांगला भाव मिळतो आहे, असे श्री.देशमुख यांनी सांगितले. महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळाचे कार्यकारी संचालक सुनील पवार यांनी प्रास्ताविक केले. सरव्यवस्थापक दीपक शिंदे यांनी आभार मानले. यावेळी जिल्हा उपनिबंधक अविनाश देशमुख, सोलापूर शहर उपनिबंधक कुंदन भोळे, व्यवस्थापक अनिमेश पाटील आदी उपस्थित होते.
शेतमाल तारण कर्ज योजनेतील विजेत्या बाजार समित्या :
अ.क्र. |
पुरस्कार |
अ वर्ग बाजार समित्या |
ब वर्ग बाजार समित्या |
क व ड वर्ग बाजार समित्या |
1 |
प्रथम पुरस्कार |
धामणगांव रेल्वे, जि. अमरावती |
मोर्शी, जि. अमरावती |
गोडपिंपरी, जि. चंद्रपूर |
2 |
व्दितीय पुरस्कार |
अमरावती, जि. अमरावती |
गडचिरोली, जि. गडचिरोली |
-- |
3 |
तृतीय पुरस्कार |
सोलापूर, जि. सोलापूर |
भिवापूर, जि. सोलापूर |
पोंभुर्णा, जि. चंद्रपूर |
ई-नाम योजनेतील विजेत्या बाजार समित्या :
अ.क्र. |
बाजार समिती |
पारितोषिक |
रक्कम |
1 |
परभणी |
प्रथम पारितोषिक |
रु. 5 लाख |
2 |
दौंड |
व्दितीय पारितोषिक |
रु. 3 लाख |
3 |
कोल्हापूर |
तृतिय पारितोषिक |
रु. 2 लाख |
4 |
वर्धा |
उत्तेजनार्थ पारितोषिक |
रु. 1 लाख |
5 |
नंदुरबार |
उत्तेजनार्थ पारितोषिक |
रु. 1 लाख |
अंशदान योजनेच्या भरणा करणाऱ्या विजेत्या बाजार समित्या :
- कृषी उत्पन्न बाजार समिती, जाफराबाद, जि. जालना
- कृषी उत्पन्न बाजार समिती, पाथरी, जि. परभणी
- कृषी उत्पन्न बाजार समिती, लातुर, जि. लातुर
- कृषी उत्पन्न बाजार समिती, खामगाव, जि. बुलढाणा
- कृषी उत्पन्न बाजार समिती, अकोला, जि. अकोला
- कृषी उत्पन्न बाजार समिती, मालेगांव, जि. वाशिम
- कृषी उत्पन्न बाजार समिती, यवतमाळ, जि. यवतमाळ
उत्पन्न बाजार समितीची स्थापना करण्यात आली. मात्र बाजार समितीच्या माध्यमातून शेतकऱ्यांना योग्य न्याय मिळाला नाही. त्यामुळे बाजार समितीच्या बाबत काही सुधारणा कराव्या लागल्या. शेतकऱ्यांना भाव मिळावा या हेतूने बाजार समितीची सुरुवात झाली. पण काही बाबतीत चुकीच्या प्रथा पडल्या. त्या दुरुस्ती करण्यासाठी राज्य शासनाने प्रयत्न सुरु केले आहेत. राज्यातील जास्तीत जास्त बाजार समित्यांनी ई-नाम योजनेत सहभागी व्हावे, यासाठी राज्य शासनाचे प्रयत्न आहेत. कारण ई-नाम योजनेत सहभागी झाल्यामुळे शेतकऱ्यांना देशभरातील बाजारपेठ खुली झाली आहे. त्यामुळे स्पर्धा होऊन शेतकऱ्यांना चांगला भाव मिळतो आहे, असे श्री. देशमुख यांनी सांगितले.
महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळाचे कार्यकारी संचालक सुनील पवार यांनी प्रास्ताविक केले. सरव्यवस्थापक दीपक शिंदे यांनी आभार मानले. यावेळी जिल्हा उपनिबंधक अविनाश देशमुख, सोलापूर शहर उपनिबंधक कुंदन भोळे, व्यवस्थापक अनिमेश पाटील आदी उपस्थित होते.
Published on: 01 March 2019, 08:54 IST