News

मागच्या वर्षी झालेल्या अतिवृष्टीमुळे कापूस आणि सोयाबीन या खरिपातील मुख्य पिकांचे अतोनात नुकसान झाले. या दोन्ही महत्त्वाच्या पिकांच्या उत्पादनात प्रचंड प्रमाणात घट आली. या दोन्ही पिकांचा बाजारभावाचा विचार केला तर कापसाच्या बाजार भावाने तर गगनभरारी घेतली आहे.

Updated on 15 February, 2022 5:01 PM IST

मागच्या वर्षी झालेल्या अतिवृष्टीमुळे कापूस आणि सोयाबीन या खरिपातील मुख्य पिकांचे अतोनात नुकसान झाले. या दोन्ही महत्त्वाच्या पिकांच्या उत्पादनात प्रचंड प्रमाणात घट आली.  या दोन्ही पिकांचा बाजारभावाचा विचार केला तर कापसाच्या बाजार भावाने तर गगनभरारी घेतली आहे.

परंतु त्या मानाने सोयाबीनच्या बाजार भावात सातत्याने चढ-उतार पाहायला मिळाली. परंतु आता दोन्ही पिकांचे बाजार भाव बऱ्यापैकी स्थिर आहेत.त्यामध्ये तूर या पिकाला खरिपाचे शेवटचे पीक म्हणून ओळखले जाते. आता तुरीची आवक बाजारपेठेत चांगली होऊ लागली आहे परंतु हमीभावापेक्षा कमी दर तुरीला मिळत आहे. मात्र सर्वसाधारण दरांचा विचार केला तर ते पाच हजार नऊशे ते सहा हजार तीनशे रुपयांच्या दरम्यान आहेत. त्यामुळे तूर उत्पादक शेतकऱ्यांनी तूर विक्रीसाठी न आनता साठवणूक करण्याला पसंती दिली आहे.

  येणारा कालावधी तुरीसाठी ठरू शकतो आशादायी

यंदा हवामानाच्या लहरीपणामुळे तुरीच्या उत्पादनात देखील घट झाली आहे. परंतु तुरीची आयात मोठ्या प्रमाणात झाल्याने सद्यस्थितीत तुरीला म्हणावे तसे भाव मिळत नाही येत.

परंतु येणाऱ्या काळात उत्पादन घटीचे चित्र जसजसे स्पष्ट होईल तसे तुमच्या दरदेखील सुधारणा होईल असा जाणकारांचा अंदाज आहे. यावर्षी तुरीच्या उत्पादनात घट होऊन ते 30 ते 30 लाख टनांच्या दरम्यान राहील असा अंदाज जाणकारांचा आहे. परंतु उत्पादनात घट झाली असली तरी आयात केल्यामुळे तुरीचे कमी दरात विक्री करण्याची शक्यता कमीच आहे. त्यामुळे येणारा एक ते दीड महिन्यानंतर तुरीच्या दरात वाढ होऊ शकेल असे जाणकारांचे मत आहे.

या कारणामुळे दर आहेत कमी

  • सध्या बाजारपेठांमध्ये हळूहळू तुरीची आवक वाढत आहे परंतु तूर डाळीला उठाव कमी राहत असल्याने डाळमिल ची खरेदी सामान्य आहे.
  • निर्यातदार देशांमध्ये कमी उपलब्धता असल्याने आयात कमी प्रमाणात होत आहे.
  • सद्यस्थितीत आयात केलेल्या तुरीचे दर देशातील पूर्वीपेक्षा कमी आहेत म्हणून या तुरीला मागणी आहे.
  • निर्यातदार जुन्या तूर मालाची विल्हेवाट लावत आहेत.
  • देशात चालू वित्तीय वर्षात नऊ महिन्यात 5.82 लाख टन तुरीची आयात झाली आहे.यंदा तूर आयातीचा दबाव बाजारात दिसत आहे. (स्त्रोत-हॅलोकृषी)
English Summary: can toordaal rate growth in some month that situation main role for that
Published on: 15 February 2022, 05:01 IST