News

गेल्या तीन आठवड्यांपासून सोयाबीनचे दर हे 6400 वर स्थिरावले होते. परंतु आता दरात घसरण सुरू झाली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांसमोर प्रश्न आहे की सोयाबीनची विक्री करावी की साठवणूक.या हंगामामध्ये सोयाबीनच्या दरात सातत्याने चढ-उतार पाहायला मिळाले.

Updated on 27 January, 2022 6:15 PM IST

गेल्या तीन आठवड्यांपासून सोयाबीनचे दर हे 6400 वर स्थिरावले  होते. परंतु आता दरात घसरण सुरू झाली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांसमोर प्रश्न आहे की सोयाबीनची विक्री करावी की साठवणूक.या हंगामामध्ये सोयाबीनच्या दरात सातत्याने चढ-उतार पाहायला मिळाले.

परंतु या सगळ्या परिस्थितीचा व्यवस्थित अभ्यास करत शेतकऱ्यांनी सावध भूमिका ठेवली. टप्प्याटप्प्याने बाजारपेठेचे अभ्यास करूनच सोयाबीन विक्रीसाठी आणले. सध्या सोयाबीनचे दर हे सहा हजार रुपयांवर येऊन ठेपले आहेत. परंतु आत्ता सोयाबीनचे दर टिकून राहण्याची अपेक्षा फक्त खाद्यतेलाच्या दरात वाढ झाली तरच आहे. जर खाद्यतेलाचे भाव वाढले तरच सोयाबीनचे दर वाढतील असा अंदाज व्यापाऱ्यांनी व्यक्त केला आहे.

गेले आठवडाभर यामध्ये सोयाबीन तेलाचे दर सुधारले आहेत. जर खाद्यतेलाच्या भावात अशीचतेजी राहिली तर सोयाबीन दराला  त्याचा आधार मिळू शकतो असा आशावाद व्यापारी व्यक्त करीत आहेत.

 सध्या असलेली सोयाबीन तेलाची परिस्थिती

 सध्या खाद्य तेलाचे दर हे तेजीत आहेत. त्यामुळे सोयाबीन आणि सूर्यफूल तेलाची आयात वाढली आहे. दुसरीकडे देशांतर्गत पाम तेलाचा तुटवडा भासत आहे. या अशा प्रतिकूल परिस्थितीमध्ये देखील सोयाबीन तेलाचा उठाव होत आहे. याच परिस्थितीचा परिणाम सोयाबीन दरावर होईल असे सांगितले जात आहे.

यावर्षी आपण पाहिले तर सोयाबीनच्या आवक वरच दर अवलंबून होते. चांगला दर मिळत असतानादेखील शेतकऱ्यांनी साठवणूक केली आणि आवक प्रमाणात ठेवली त्याचा अधिक फायदा हा शेतकऱ्यांना झाला होता. आता प्लांट धारकांकडून देखील सोयाबीनची मागणी होत आहे. त्यामुळे सध्याच्या प्रतिकूल परिस्थितीमध्ये सोयाबीन तेलाच्या वाढत्या घराचा आधार सोयाबीन मिळतो का ते पाहावे लागणार आहे.

English Summary: can this market situation give to support soyabioen rate growth
Published on: 27 January 2022, 06:15 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)