यावर्षी कापसाचे बाजार भाव कधी नव्हे एवढा उच्चांकी पातळीवर आहेत. जर आपण गेल्या तीन ते चार महिन्यांचा विचार केला कापसामध्ये होणारी दरवाढ ही सातत्याने होतच राहिली.
यामागे कापूस उत्पादनात झालेली घट हे प्रमुख कारण मानले जात आहे. कारण जगातील जे प्रमुख कापूस उत्पादक देश आहेत व त्यासोबत भारतात देखील कापसाचे उत्पादन 70 टक्केच झाल्यामुळेही दरवाढ झाल्याचे अंदाज आहे.जर आपण 353 किलो म्हणजेच एक खंडी कापसाचा विचार केला तर 45 हजार रुपये खंडी सहामहिन्या अगोदर होते ते आता एक लाख दहा हजारांपर्यंत गेले आहेत.
यावरून या दरवाढीचा अंदाज येतो. परंतु या दरात देखील कापूसमिळणे दुरापास्त झाले आहे.या सगळ्या परिस्थितीचा फायदामोठ्या कापूस व्यापाऱ्यांना आणि बहुराष्ट्रीय कंपन्यांना झाला असून यावर नियंत्रण आणण्याची जबाबदारी केंद्र सरकारची असतानाहीकेवळ बैठकांचा सोपस्कारपार पाडणे पलीकडे काहीही न करता प्रश्नाकडे पूर्णपणे डोळेझाक करण्यात आली आहे.
या सगळ्या परिस्थितीचा फटका हा सूतगिरण्यांना मोठ्या प्रमाणात बसण्याची शक्यता आहे. कापसाला केंद्र सरकारचा जो काही हमीभाव होता त्याच्या दुप्पट दराने खुल्या बाजारात कापसाची विक्री होत असल्यामुळे शेतकऱ्यांनी खुल्या बाजारात कापूस विकण्याला पसंती दिली. आता शेतकऱ्यांकडे कापूस शिल्लक नसून तो आतामोठा व्यापाऱ्यांच्या गोदामात बंद झाला आहे अशी एकंदरीत परिस्थिती आहे.
कापसाअभावी सूतगिरण्यांची बिकट परिस्थिती
सूत गिरण्या या कापसाच्या उपलब्धतेसाठी चिंताग्रस्त असताना बाजारपेठेत कापसाचे प्रचंड टंचाई निर्माण झाल्यामुळे सूतगिरण्याकडे केवळ सात ते आठ दिवस पुरेल इतकाच कापूस शिल्लक असल्यामुळे या परिस्थितीत सध्या तरी काहीतरी सुधारणा होईल अशी स्थिती नाही.
सूतगिरण्या येत्या जून महिन्यापासून बंद पडण्यास सुरुवात होईल हे नक्की. याच कारणामुळे दक्षिण भारतातील साउथ इंडिया स्पिनर्स असोसिएशन कोइमतूर यांनीनविन कापूस बाजारात येईपर्यंत सूतगिरण्या बंद करण्याचा निर्णय घेतला असून
महाराष्ट्रातील सहकारी व खाजगी सूत गिरण्या बंद करण्याचा निर्णय जाहीर करावा, अशी मागणी अनेक सूतगिरणी चालकांनी आपापल्या संघटनांकडे केली आहे.
महत्वाच्या बातम्या
नक्की वाचा:Mansoon 2022: हवामान विभागाकडून तारीख पे तारीख!! आता 'या' तारखेला धडकणार मान्सून
नक्की वाचा:Pm Kisan: मोठी बातमी! पीएम मोदी शिमलाहुन 'या' दिवशी देणार कोट्यावधी शेतकऱ्यांना दोन हजार
नक्की वाचा:आता डोकेदुखीची चिंता मिटली; चार आयुर्वेदिक उपाय ठरले प्रभावशाली,जाणून घ्या
Published on: 28 May 2022, 09:32 IST