News

सध्या खरीप हंगामाच्या पेरण्या बऱ्यापैकी आटोपल्या असून मागच्या वर्षीच्या तुलनेमध्ये जुलै महिन्याच्या पहिल्या पंधरवड्यापर्यंत भात आणि तूर या दोन पिकांचे लागवड क्षेत्र घटले असून इतर सर्व पिकांच्या लागवड क्षेत्रात थोड्या अधिक फरकाने वाढ झाली आहे.

Updated on 19 July, 2022 1:27 PM IST

 सध्या खरीप हंगामाच्या पेरण्या बऱ्यापैकी आटोपल्या असून मागच्या वर्षीच्या तुलनेमध्ये जुलै महिन्याच्या पहिल्या पंधरवड्यापर्यंत भात आणि तूर या दोन पिकांचे लागवड क्षेत्र घटले असून इतर सर्व पिकांच्या लागवड क्षेत्रात थोड्या अधिक फरकाने वाढ झाली आहे.

तसेच युक्रेन च्या संकटामुळे बहुतांश कृषी मालामध्ये घसरण झाल्याने केवळ तांदूळ आणि कडधान्याचे उत्पादन स्थिरावले आहे. तसेच तांदूळ आणि डाळीचा दरामध्ये वाढ होण्याची शक्यता आहे. जर या संबंधित कृषी मंत्रालयाच्या आकडेवारीचा विचार केला तर15 जुलैपर्यंत लागवड क्षेत्र 17.4 टक्क्यांनी घटले.

नक्की वाचा:Sprey On Crop:असेल पाण्याचा दर्जा चांगला तर येईल फवारणीचा रिझल्ट चांगला, वाचा सविस्तर माहिती

मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, छत्तीसगड, बिहार आणि पश्चिम बंगाल मध्ये आतापर्यंतभात लागवड क्षेत्रात गेल्या वर्षाच्या तुलनेत 31 टक्केपर्यंत घट झाल्याचे दिसून आले.

यामागच्या कारणांचा विचार केला तर या राज्यांमध्ये अजून पर्यंत एकूण पाऊस 68 टक्‍क्‍यांपर्यंत पाऊस कमी झाला आहे. तसेच भाता सोबतच डाळीच्या भावा देखील बदल होऊ शकतो.

नक्की वाचा:यंदाच्या खरीप हंगामात घ्या तुरीचे भरघोस उत्पन्न; जाणून घ्या लागवड हे महत्त्वाचे तंत्र

 मागच्या वर्षी देखील कमी झाले होते उत्पादन

 ओरिगो कमोडिटीजचे वरिष्ठ उपाध्यक्ष राजीव यादव यांनी सांगितले की,यावर्षी देखील तांदळाचे उत्पादन कमी झाले असून काही महिन्यांपासून जगभरातील पुरवठ्यामध्ये कमतरता दिसून येत आहे. सरकारी खरेदीचा विचार केला तर ती देखील कमी होत आहे.

2021 22 चा रब्बी हंगामात 44 लाख टन धानाची सरकारी खरेदी झाली. त्या तुलनेत 2021 22 मध्ये 66 लाख टन आणि 2019-20 मध्ये 80 लाख टन तांदूळ खरेदी करण्यात आला होता. यावर्षी तांदूळ खरेदी 135 लाख टनापर्यंत पोचण्याची शक्यता आहे.

नक्की वाचा:भाजीपाला लागवड: जुलै महिन्यात करा 'या' 5 भाजीपाला पिकांची लागवड आणि कमवा भरपूर पैसा, वाचा सविस्तर माहिती

English Summary: can rice plate expensive due to decrease cultivation field of paddy and piegeon pea
Published on: 19 July 2022, 01:27 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)