मोदी सरकारची सगळ्यात महत्वकांशी योजना म्हणजे पंतप्रधान किसान सन्मान निधी योजना होय. या योजनेअंतर्गत वार्षिक सहा हजार रुपये तीन टप्प्यात विभागून थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात येतात.
आतापर्यंत नऊ हप्तेशेतकऱ्यांच्या खात्यात वर्ग करण्यात आले आहेत. परंतु अजूनही या योजनेबाबत असलेल्या पात्र ते विषयी बरेच प्रश्न आहेत. त्यातील एक म्हणजे पती-पत्नी दोघेही या योजनेचा लाभ घेऊ शकतात का? हा एक महत्त्वाचा प्रश्न आहे. या लेखात आपण या योजने विषयी काही नियम समजून घेऊया.
पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेचा लाभ कोणाला मिळणार?
या योजनेच्या नियमानुसार पीएम किसान सम्मान निधि योजना चा लाभ पती-पत्नी दोघेही घेऊ शकत नाहीत.
जर असा प्रकार आढळला तर सरकार त्याला बनावट घोषित करून त्याकडून दिले गेलेले हप्ते वसूल करेल. तसेच कुटुंबातील कोणी व्यक्ती करदाते असतील अशा व्यक्तींना या योजनेचा लाभ मिळणार नाही. दुसरे महत्त्वाचे म्हणजे एकाद्या शेतकऱ्याकडे शेतजमीन आहे परंतु ती जमीन तो शेती कामासाठी न वापरता इतर कामांसाठी वापरत असेल किंवा दुसऱ्याच्या शेतात जाऊन शेतीचे काम करत असेल अशा व्यक्तींना या योजनेचा लाभ मिळत नाही. तिसरे महत्त्वाचे म्हणजे एखादा शेतकरी आहे.
परंतु तो जी शेती कसत आहे ती त्याच्या नावावर नसून वडिलांच्या किंवा आजोबांच्या नावावर असेल तर अशाशेतकऱ्याला या योजनेचा लाभ मिळत नाही
एखादा शेतकरी जमिनीचा मालक असेल पण तो सरकारी कर्मचारी असेल किंवा माजी खासदार, मंत्री असेल तर अशा व्यक्ती या योजनेसाठी पात्र नाहीत. तसेच अभियंते, चार्टर्ड अकाउंटंट, नोंदणीकृत डॉक्टर अशा व्यक्ती सुद्धा या योजनेसाठी अपात्र आहेत.
Published on: 10 October 2021, 09:53 IST