News

शासनाकडून सातत्याने फळबाग लागवडीसाठी प्रोत्साहन दिले जाते तसेच विविध प्रकारच्या फळांची निर्यात वाढवावी यासाठी शासन स्तरावर प्रयत्न केले जातात व विविध प्रकारचे उपक्रम राबविण्यात येतात.

Updated on 07 February, 2022 2:39 PM IST

 शासनाकडून सातत्याने फळबाग लागवडीसाठी प्रोत्साहन  दिले जाते तसेच विविध प्रकारच्या फळांची निर्यात वाढवावी यासाठी शासन स्तरावर प्रयत्न केले जातात व विविध प्रकारचे उपक्रम राबविण्यात येतात.

याचाच एक भाग म्हणून डाळिंबाची निर्यात वाढावी यासाठी संबंधित विभागाने पुढाकार घेतला असून त्या माध्यमातून राज्यातील प्रत्येक जिल्ह्यांमधून शेतकर्‍यांनी डाळींब निर्यातीसाठी नोंदणी करावी यासाठी अभियान राबवले जात आहे. या माध्यमातून यावर्षी राज्यातूनच नव्हे तर संपूर्ण देशातून डाळिंब निर्यातदारांच्या संख्येत वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

 डाळिंब निर्यातीची सध्याची परिस्थिती

जर भारतामधील डाळिंब निर्यातीचा विचार केला तर कर्नाटक, गुजरात आणि आंध्र प्रदेश तसेच महाराष्ट्रातून  युरोपीय तसेच अन्य देशांमध्ये डाळिंबाची निर्यात मोठ्या प्रमाणात केली जाते.

 जर मागच्या वर्षीचा विचार केला तर देशातून 2400 शेतकऱ्यांनी डाळिंब निर्यातीसाठी नोंदणी केली होती. डाळिंब पिकाचा विचार केला तर हे वातावरणाला अतिशय संवेदनशील असल्यामुळे गेल्या चार वर्षांपासून नैसर्गिक आपत्ती मोठ्या प्रमाणावर येत आहे तरी सुद्धा शेतकरी व्यवस्थित आणि काटेकोर नियोजन करून डाळिंबाच्या बागा यशस्वी करत आहे. आतापर्यंत संपूर्ण देशात डाळिंब निर्यात करण्यासाठी 2432 डाळिंब उत्पादक शेतकऱ्यांनी नोंदणी केली आहे. 

चालू हंगामामध्ये तीन हजारांपेक्षा अधिक डाळिंब निर्यातदारांची नोंदणी होण्याची शक्यता आहे. मागच्या वर्षी प्रमाणे या वर्षी देखील डाळिंब पिकाला मोठ्या प्रमाणात नैसर्गिक आपत्तीचा फटका बसला आहे. अशा परिस्थितीत सुद्धा डाळिंबाच्या निर्यातीसाठी शेतकऱ्यांनी पुढे येण्याचे आव्हान कृषी विभागाने केले आहे.

English Summary: can growth of pomegranet export this year effort to agri department
Published on: 07 February 2022, 02:39 IST