सध्या पशुखाद्य तसेच चारा च्या किमती मध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे.पशुखाद्याचे दर देखील मोठ्या प्रमाणात तेजीत आहेत.
त्यामुळे पशुपालन करणारे शेतकरी या खर्चामुळे चिंताग्रस्त आहेत.या वाढीव खर्चामुळे अनेक शेतकरी दुधाचे दर वाढविण्याची मागणी करत होते.त्यामुळे शेतकऱ्यांना थोडाफार दिलासा मिळण्याची शक्यता आहे. आता दुधाचे भाव वाढतील अशी दाट शक्यता आहे. पोषक वातावरणामुळे दरवर्षी नोव्हेंबर ते मार्च या कालावधीमध्ये दुधाच्या उत्पादनात वाढ होते. या कालावधीत देखील दुधाचे उत्पादन वाढण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
सध्याच्या काळात दुधाच्या उत्पादनाच्या तुलनेत चाऱ्याच्या किमती या प्रचंड प्रमाणात वाढले असून गेल्या वर्षभरामध्ये पशुखाद्याच्या दरांमध्ये देखील 50 ते 60 टक्क्यांनी वाढ झाली आहे. त्यामुळे दूध उत्पादनावरील खर्च हा वाढला असून चाऱ्या चा पुरवठा देखील नियमित होत नसल्याने दुधाच्या दरवाढीची शिवाय पर्याय नसल्याचे मत दुग्ध तज्ञांकडून वर्तवण्यात आले आहे. हा निर्णय वरिष्ठ पातळीवर होण्याची शक्यता अनेकांनी सांगितले आहे.सध्याचे वाढलेले इंधनाचे दर आणि विजेचे दर यामुळे उत्पादक संघांचा देखील खर्च बराच वाढला आहे.
एक प्रमुख कारण देत दूध संघांकडून दूध दरांमध्ये वाढ करण्यात आली आहे. महागाईमुळे शेतकरी आर्थिक खर्चात आणखी खचला आहे. लवकरच दुधाच्या दरात वाढ होण्याची शक्यता आहे.शेतकऱ्यांचा देखील खर्च वाढला असल्याने दूध दरात वाढवावी अशी मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे.
Published on: 03 February 2022, 03:45 IST