सध्याचा कापुस बाजारभावाचा विचार केला तर यामध्ये सातत्याने चढ उतार पाहायला मिळत असून शेतकऱ्यांना अजूनही अपेक्षित भाव मिळत नाहीये. आपल्याला माहित आहेस की मागच्या वर्षी कधी नव्हे एवढे उच्चांकी दर कापसाला मिळाले होते व हीच परिस्थिती यावर्षी देखील राहील अशी शेतकऱ्यांना आशा होती. परंतु यावर्षी जरा उलट परिस्थिती दिसून येत असून मागच्या वर्षीच्या तुलनेत कापूस दरात घसरण झालेली पाहायला मिळत आहे. कापसाचा हंगाम जोरात सुरू झाला असून अजून देखील हव्या त्या प्रमाणात कापसाची आवक होताना दिसून येत नाहीये.
नक्की वाचा:कांद्याचा वांदा! शेतकऱ्याने रेखाटली कांद्यावर नरेंद्र मोदींची मुद्रा, शेतकरी अडचणीत
सध्या कापसाची एकंदरीत परिस्थिती
या हंगामाचा विचार केला तर या हंगामामध्ये कापसाचा अधिक उत्पादन खर्च शेतकरी बंधूंना करावा लागत असून शेतकऱ्यांना कापूस वेचणीचा देखील खर्च जास्त करावा लागत आहे. सध्या मजुरी ही प्रति किलो बारा ते पंधरा प्रतीकिलोच्या दरम्यान झाली असून म्हणजेच क्विंटलला 1200 ते 1500 इतका खर्च शेतकरी बंधूंना करावा लागत आहे.
त्यामुळे या सगळ्या परिस्थितीमुळे शेतकऱ्यांना कापसाचे भाव वाढतील अशी अपेक्षा असून सध्याचे बाजारभावाचा विचार केला तर तो 8200 ते 8 हजार 700 रुपये प्रति क्विंटलपर्यंत मिळत आहे. परंतु जर कापूस उत्पादनासाठी लागणाऱ्या खर्चाचा विचार केला तर त्या दृष्टिकोनातून हा बाजारभाव शेतकऱ्यांना परवडत नाही असे एकंदरीत चित्र आहे व याचाच परिणाम कापूस आवक कमी होण्यावर दिसून येत आहे. परंतु सध्याची परिस्थिती पाहिली तर कापूस दरावर आवकेचा परिणाम दिसून येत नाहीये.
आपण कापूस उद्योगाचा विचार केला तर कापसावर असलेल्या आयात शुल्क रद्द करण्याची मागणी उद्योगाकडून करण्यात आली असल्याने त्याचा परिणाम कुठेतरी कापूस बाजारावर दिसून येत आहे. त्यामुळे बाजारभावात प्रतिक्विंटल 200 ते 300 रुपयांपर्यंतची घसरण पाहायला मिळत आहे.परंतु या क्षेत्रातील जाणकार लोकांचा विचार केला तर त्यांच्यामध्ये आयात शुल्क सरकार रद्द करणार नसल्याचे सांगितले जात आहे व जर आयातशुल्क रद्द केले तरीदेखील त्याचा कापूस दरावर काही परिणाम होईल असे दिसत नाही. परंतु कापूस बाजार भावाबाबत दिलेल्या माहितीनुसार या महिन्यात कापूस दरात चढ-उतार पाहायला मिळणार आहे.
परंतु पुढील महिन्यापासून कापसाच्या दरात थोडीशी सुधारणा होऊ शकते आणि कापसाला सरासरी 9000 रुपये प्रतिक्विंटल पर्यंतचा दर मिळेल असा एक जाणकारांचा अंदाज आहे. त्यामुळे पुढील महिन्यापासून निश्चितच थोडाफार दिलासा कापूस उत्पादक शेतकऱ्यांना मिळेल अशी एकंदरीत परिस्थिती आहे. त्यामुळे शेतकरी बंधूंनी बाजारपेठेचा अंदाज घेऊन टप्प्याटप्प्याने विक्री करणे फायदेशीर ठरू शकते.
Published on: 11 December 2022, 09:17 IST