महाराष्ट्र मध्ये कापसाची लागवड फार मोठ्या प्रमाणावर केली जाते. खरीप हंगामातील एक महत्त्वाचे पीक म्हणून त्याकडे पाहिले जाते. आपल्याला माहित आहे की, मागच्या वर्षी कापसाला कधी नव्हे एवढे उच्चांकी दर मिळाले होते. त्या अनुषंगाने या वर्षी कापसाच्या एकूण लागवड क्षेत्रामध्ये वाढ होईल असा अंदाज होता. त्यानुसार कापसाच्या लागवड क्षेत्रात वाढ झाली.
परंतु यावर्षी देखील जुलै आणि सप्टेंबर महिन्यामध्ये अतिवृष्टी झाली व त्यामुळे कापूस पिकाचे अतोनात नुकसान झाले. आता कापसाची काढणी जोरात सुरू असून परतीच्या पावसाने परत त्यावर संकट आणले आहे.
नक्की वाचा:Vegetables Rates: भाजीपाल्याचे भाव कडाडले! टोमॅटो 60 रुपये तर फ्लॉवर 150 रुपये किलो
जर आपण महाराष्ट्रातील प्रमुख कापूस उत्पादक पट्ट्याचा विचार केला तर यामध्ये जळगाव, धुळे, नंदुरबार आणि नाशिक जिल्ह्याचा काही भाग आणि मराठवाडा आणि विदर्भात मोठ्या प्रमाणावर कापसाची लागवड होते.
परंतु या ठिकाणीदेखील परतीच्या पावसाने कहर केला असून कापूस शेतातच पावसात भिजत असल्याने त्याची प्रत खालावत आहे. सध्या कापुस बाजार भावाचा विचार केला तर खूप कमी भाव मिळत असून त्यामुळे शेतकरी बांधव कापूस साठवण याकडे भर देत असल्याचे दिसून येत आहे.
परंतु सध्या दिवाळी तोंडावर आल्यामुळे आणि बऱ्याच शेतकऱ्यांना कापूस साठवायला पुरेशी जागा उपलब्ध नसते. त्यामुळे शेतकरी बांधव कापसाची विक्री करण्याकडे भर देतात. बरेश आर्थिक गरजा पूर्ण करण्यासाठी कापसाची विक्री करण्याशिवाय काही शेतकरी बंधूंना पर्याय नसतो.
या दरम्यान या क्षेत्रातील तज्ज्ञ लोकांच्या मते सध्या उद्योग क्षेत्राकडून देखील कापसाचे मागणी खूप कमी आहे.त्यासोबत सूतगिरणी देखील अजून पूर्ण क्षमतेने सुरू झालेल्या नाहीत.आंतरराष्ट्रीय स्तरावरील मंदीचे सावट इत्यादी कारणामुळे अजून देखील कापसाला हवी तेवढी मागणी नाही.
परंतु येणाऱ्या काही महिन्यात संबंधित उद्योगांकडून कापसाची मागणी वाढणार असून देशांतर्गत बंद असलेल्या सूतगिरणी देखील चालू होऊन पूर्वपदावर येतील. तेव्हा कापसाला मागणी वाढेल व येणाऱ्या काही महिन्यांमध्ये कापसाच्या बाजार भाव देखील वाढ होईल असा तज्ञांचा अंदाज आहे.
काय आहे तज्ञांचा अंदाज?
गेल्या काही महिन्यांमध्ये कापसाच्या बाजार भावात वाढ होणार असल्याचे तज्ञांचे मत असून त्यांच्या मते कापसाला यंदा बाजार प्रतिक्विंटल 9 हजार पर्यंतचा सरासरी बाजार भाव मिळणे शक्य आहे. परंतु शेतकरी बंधूंना यापेक्षा जास्त बाजार भाव मिळावा अशी अपेक्षा आहे.
जर आपण सध्याच्या बाजारभावाचा विचार केला तर 17 ऑक्टोबर रोजी वरोरा माढेली या ठिकाणी कापसाचा लिलावात आठ हजार रुपये प्रति क्विंटल एवढा बाजारभाव मिळाला तर 70 क्विंटल आवक झाली होती. जर 15 तारखेचा विचार केला तर आर्वी बाजारात 231 क्विंटल एच -4 मध्यम स्टेपल कापसाची आवक झाली होती व त्या दिवशी झालेल्या लिलावात या कापसाला 8021 रुपये प्रति क्विंटल एवढा जास्तीत जास्त दर मिळाला होता.
त्यादिवशी कमीत कमी बाजार भाव 7850 तर सरासरी दर सात हजार 950 रुपये प्रति क्विंटल होते. जर आपण या बाजारभावाचा विचार केला तर निश्चितच हा बाजार भाव शेतकरी बांधवांच्या अपेक्षेप्रमाणे नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना अजून बाजारभावात वाढ होण्याची अपेक्षा आहे.
येणार्या भविष्यकाळात कापसाच्या बाजारभावात वाढ होण्याची आशा तज्ञांनी व्यक्त केले असून येणाऱ्या कालखंडात कापसाला काय दर मिळतो याकडे सगळ्यांचे लक्ष लागून राहणार आहे.
Published on: 19 October 2022, 03:34 IST