News

नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील तीन लाख शेतकऱ्यांना अजून अठराशे कोटी रुपये मदत दिली जाण्याची शक्यता आहे. हवामानातील प्रतिकूल बदल यामुळे शेतीत अनेक प्रकारची संकटे उद्भवतात.

Updated on 24 April, 2022 12:37 PM IST

 नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील तीन लाख शेतकऱ्यांना अजून अठराशे कोटी रुपये मदत दिली जाण्याची शक्यता आहे. हवामानातील प्रतिकूल बदल यामुळे शेतीत अनेक प्रकारची संकटे उद्भवतात

या संकटांना सामोरे जाता यावे यासाठी शेतकरी आणि शेती या दोन्ही घटकांना सक्षम बनविण्याचे उद्दिष्ट या प्रकल्पाचे आहे. सन 2018 राज्यातील पाच हजार 142 गावांमध्ये हा प्रकल्प राबवला जात असून 2024 पर्यंत चालू राहणार आहे. या प्रकल्पातून शेती व शेतकऱ्यांसाठी जवळ जवळ चार हजार कोटी रुपये खर्च केले जाणार असून यातील 70 टक्के निधी हा जागतिक बँकेकडून कर्जाऊ घेण्यात आला आहे. या प्रकल्पाची अंमलबजावणी सनदी अधिकारी करतात आणि राज्यस्तरीय समन्वयाची जबाबदारी कृषी खात्याकडे देण्यात आली आहे. या प्रकल्पाच्या अगदी सुरुवातीपासूनच वरिष्ठ अधिकारी विजय कोळेकर समन्वयकाची भूमिका पार पाडीत आहेत. याबाबतीत सूत्रांच्या म्हणण्यानुसार, राज्यातील तीन लाखशेतकऱ्यांच्या आधारलिंक बँक खात्यात मार्चच्याअखेर पर्यंत 1873 कोटी रुपये ट्रान्सफर करण्यात आले आहेत.

एवढेच नाही तर  1420 शेतकरी गट व शेतकरी उत्पादक कंपन्यांना144 कोटी रुपये देण्यात आलेले आहे.या प्रकल्पाचे मुख्य कार्यक्षेत्र हे विदर्भ आणि मराठवाड्यातील जिल्हे आहेत. परंतु प्रकल्पाचे मुख्यालय आणि प्रकल्प व्यवस्थापन कक्ष मुंबईत आहे. गतिमान काम आणि पारदर्शकता आहे या प्रकल्पाचे मुख्य वैशिष्ट्य असून यंदाच्या राजीव गांधी प्रशासकीय गतिमानता प्रगती अभियानाचे द्वितीय पारितोषिक पोकराला मिळाले आहे. शेतकऱ्यांना या प्रकल्पातील योजनांसाठी संकेतस्थळ आणि मोबाईल मधील एप्लीकेशन द्वारे नोंदणी करता येते आतापर्यंत दहा लाख शेतकऱ्यांनी नोंदणी केली आहे.

 नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजना प्रकल्पाची वैशिष्ट्ये

1- आधार लिंक बँक खात्यामध्ये अनुदानाचे ट्रान्सफर

2- शून्य डेटा एंट्री ऑपरेटर असलेला राज्यातील एकमेव प्रकल्प

3- प्रत्येक कामाचे आणि लाभाचे रिअल टाईम म्हणजेच त्याच वेळी जिओ टॅगिंग

4- शेतकऱ्यांनी संबंधित काम पूर्ण करताच मागणीनंतर पाच दिवसात अनुदान खात्यात जमा

5- शेतकऱ्यांना त्यांच्या अनुदान प्रस्तावाची तात्काळ माहिती

6- कृषी सहाय्यकांकडून एकही अहवाल न मागणारा प्रकल्प

7- गावनिहाय लाभार्थ्यांची यादी रोज अपडेट व खुली ठेवणारी पद्धत ( संदर्भ स्त्रोत- ॲग्रोवन )

 महत्वाच्या बातम्या

नक्की वाचा:सनीच्या वाढदिवसाची राज्यात चर्चा!! चांदीची गदा देऊन केला वाढदिवस केला साजरा..

नक्की वाचा:शेतकऱ्यांनो आपत्कालीन पीक नियोजन ठरतय फायदेशीर, वाचा संपूर्ण माहिती..

नक्की वाचा:महाराष्ट्राच्या शेतकऱ्याची सेंद्रिय शेती मार्गदर्शनासाठी पंजाबवारी, शेतकऱ्यांना होणार फायदा...

English Summary: can get 1800 crore rupees by state government to farmer
Published on: 24 April 2022, 12:26 IST