सध्या उत्तर भारताचा विचार केला तर उत्तर भारतामध्ये हिमालयीन प्रदेश तसेच जम्मू आणि काश्मीर आणि लगतच्या बऱ्याच भागांमध्ये सध्या पाऊस आणि हिमवृष्टी होत आहे. या परिस्थितीमुळे उत्तर भागाकडून येणारे वारे हे महाराष्ट्राच्या वायव्य भागात येत आहेत.
त्यामुळे महाराष्ट्राच्या वायव्य भागामध्ये थंडीचे प्रमाण वाढले आहे. याबाबतीतला हवामान खात्याचा अंदाज पाहिला तर आठ फेब्रुवारी पासून पश्चिम हिमालय प्रदेश, जम्मू काश्मीर,गिलगीट, बाल्टिस्तान, मुजफ्फराबाद हिमाचल प्रदेश इत्यादी भागांमध्ये विजांच्या कडकडाटासह पावसाच्या हलक्या सरी पडणार आहेत. तसेच हिमालयाच्या काही भागांमध्ये हिमवृष्टी होण्याचा देखील अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. या सगळ्या पार्श्वभूमीवर हवामान खात्याने आता आठ फेब्रुवारीपासून पश्चिम हिमालय प्रदेश, जम्मू काश्मीर, लडाख, बाल्तिस्तान, मुजफ्फराबाद, हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंड याठिकाणी विजांच्या कडकडाटासह हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या सरी कोसळणार असल्याचे सांगितले आहे.
या पार्श्वभूमीवर या चक्रीय वाताचा परिणाम महाराष्ट्रावर देखील होण्याची शक्यता असल्याचे हवामान खात्याने सांगितले आहे. त्यामुळे चिंतेत आणखी भर पडली आहे. या सगळ्या हवामानाचा परिणाम महाराष्ट्रातील जळगाव, धुळे, नंदुरबार तसेच संपूर्ण खानदेश पट्ट्यावर तसेच विदर्भातीलबुलढाणा, अमरावती, नागपूर, तसेच नाशिक आणि औरंगाबाद जिल्ह्यात होईल. त्यामुळे शेतकऱ्यांनी उभ्या पिकांची काळजी घेणे विशेष गरजेचे आहे.
तसेच 8 फेब्रुवारी पासून पुन्हा एकदा वायव्य भारतात पश्चिम वाऱ्याच्या डिस्टर्बन्समुळे काही बदल होतील. त्यामुळे 9 आणि 10 फेब्रुवारी च्या कालावधीत नागपूर सोबतच विदर्भातील तापमानाचा पारा अचानक दोन ते चार अंशांनी घसरण्याची देखील शक्यता आहे. येत्या काही तासांमध्ये याचा परिणाम हा राजस्थान आणि गुजरात मध्ये देखील जाणवणार आहे
Published on: 08 February 2022, 10:55 IST