News

लेमनग्रास शेतीच्या क्षेत्रात भारताने बरीच प्रगती केली आहे. यामुळे काही वर्षापूर्वी लेमनग्रास चा सर्वात मोठा आयातदार असलेला भारत देश जगातील सर्वात मोठ्या निर्यातदारांच्या यादीत सामील झाला आहे.

Updated on 31 May, 2022 9:32 PM IST

 लेमनग्रास शेतीच्या क्षेत्रात भारताने बरीच प्रगती केली आहे. यामुळे काही वर्षापूर्वी लेमनग्रास चा सर्वात मोठा आयातदार असलेला भारत देश जगातील सर्वात मोठ्या निर्यातदारांच्या यादीत सामील झाला आहे.

लेमनग्रास लागवड क्षेत्रात भारताने हे अभूतपूर्व यश संपादन केले आहे. भारताने यश अरोमा मिशन प्रकल्पाच्या अंतर्गत संपादन केलेअसून या प्रकल्पाचे खूप मोठे योगदान आहे. अरोमा मिशनचे नेतृत्व CSIR-CIMAP, लखनऊ करत आहे.

विशेष म्हणजे झारखंडमध्ये देखील शेतकरी लेमन ग्रास ची लागवड मोठ्या प्रमाणावर करतात. विशेषता खुंटी आणि लातेहार जिल्ह्यातील ग्रामीण महिला लेमन ग्रास च्या लागवडीतून चांगले उत्पन्न मिळवत आहे.

नक्की वाचा:बजाजने सर्वात स्वस्त बाइक केली बंद, सर्वांना परवडणारी गाडी बंद झाल्याने अनेकांची नाराजी

 सीआयएसआर - सीआयएमए चालक प्रबोध कुमार त्रिवेदी यांनी अरोमा मिशनचे आभार मानताना सांगितले की, दरवर्षी सुमारे एक हजार टन लेमनग्रासचे उत्पादन होते. यातून तीनशे ते चारशे टन निर्यात होते. विशेष म्हणजे अरोमा मिशन पीएम मोदींच्या स्वावलंबी मिशन अशी सुसंगत कार्य करते.

वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन परिषदेने देशातील अत्यावश्यक तेल आधारित सुगंध उद्योगाची स्थापना, प्रचार आणि स्थान निश्चित करण्यात महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे. याचा फायदा उद्योगांना तसेच शेतकऱ्यांना आणि व्यवसायाच्या पुढील पिढीला झाला. कालांतराने लेमन ग्रास चे निर्यातीला प्रोत्साहन दिले.

 2028पर्यंत 81 दशलक्ष पर्यंत असेल लेमनग्रास मार्केट

 कोरोना कालावधीत जगात लेमन ग्रास ची मागणी झपाट्याने वाढली आहे. त्याचा वापर सॅनिटायझर बनवण्यासाठी होतो. सी एस आय आर - सी आय एम ए पी, लखनऊ नुसार 2020मध्ये लेमाँग्रस्स ची जागतिक बाजारपेठ  USD 38.02 दशलक्ष होती जी 2021 मध्ये USD 41.98 दशलक्ष वरून 2028पर्यंत 81.43दशलक्ष इतकी वाढण्याची अपेक्षा आहे.

 भारतात या भागातील शेतकरी करतात लेमनग्रास ची लागवड

नक्की वाचा:आरोग्यासाठी लाभदायक जिरा पाणी; जाणून घ्या जिरा पाणी बनवण्याची प्रक्रिया

भारतातील लेमन ग्रास ची लागवड बहुतेक शेतकऱ्यांना आवडते कारण ती कमी पावसातही केली जाऊ शकते. याच्या लागवडीला जास्त सिंचनाची गरज नसून जास्त काळजी घेण्याची देखील आवश्यकता नाही. लेमन ग्रास च्या लागवडीसाठी फार सुपीक जमीन असावी असे देखील काही नाही.

कधी रिकाम्या जागी त्याची लागवड करू शकतात. विदर्भ, बुंदेलखंड, मराठवाडा, केरळ, उत्तर प्रदेश, आंध्र प्रदेश, कर्नाटक, ओडिसा आणि झारखंडमध्ये याची लागवड मोठ्या प्रमाणात केली जाते.

सुगंध मिशन अंतर्गत आणली दोन हजार हेक्टर जमीन लेमनग्रास लागवडीखाली

 सी आय एम ए पी यांच्यानुसार, सुगंध मिशन अंतर्गत 2000 हेक्टर पेक्षा जास्त क्षेत्र लेमनग्रास लागवडीखाली आणले गेले असून त्यामुळे लेमनग्रास तेलाचे उत्पादन देखील वाढले आहे. देशावरील आयातीचा बोजा कमी होऊन निर्यात वाढण्यास मदत झाली आहे.

सी आय एम ए पी यांनी सादर केलेल्या कृष्ण आणि सी आय एम - शिखर सारख्या उच्च उत्पादक वानांनी अधिक आवश्यक तेलाचा पुरवठा केला आणि जेथे जुने वान घेतले होते त्याचे पीक उत्पादनात दुपटीने वाढ झाली.

नक्की वाचा:राज्यात घडली हृदय पिटाळून टाकणारी घटना; वाघ्याच्या हल्ल्यात शेतकरी राजाचा मृत्यू

English Summary: can bright future for farmer in lemongrass crop cultivation
Published on: 31 May 2022, 09:32 IST