News

पाण्याला जीवन असे म्हटले जाते. मनुष्य, प्राणी इतकेच नाही तर अवघे चराचर पाण्याशिवाय तग धरू शकत नाही. त्यातच शेती म्हटले म्हणजे पाणी हा शेतीचा आत्मा आहे. आपल्याला माहित आहेच की, पाण्याशिवाय शेती करणे जवळजवळ दुरापास्त आहे.

Updated on 13 April, 2022 9:09 AM IST

 पाण्याला जीवन असे म्हटले जाते. मनुष्य, प्राणी इतकेच नाही तर अवघे चराचर पाण्याशिवाय तग धरू शकत नाही. त्यातच शेती म्हटले म्हणजे पाणी हा शेतीचा आत्मा आहे. आपल्याला माहित आहेच की, पाण्याशिवाय शेती करणे जवळजवळ दुरापास्त आहे.

परंतु महत्वाच्या असलेल्या या पाण्याचे  व्यवस्थापन आणि वापर या बाबतीत आपण किती जागरूक आहोत. हा एक मोठा प्रश्नच आहे. शेतीच्या बाबतीत विचार करायचा झाला तर सिंचनासाठी पाण्याचे योग्य व्यवस्थापन, पाण्याच्या एक एक  थेंबाचा कार्यक्षम वापर व त्या दृष्टीने केलेले नियोजन हे पाण्याची बचत करण्यासाठी तसेच उपलब्ध पाण्यातून योग्य नियोजन करून शेती व्यवसायातून चांगले उत्पादन मिळविण्यासाठी महत्वाचे आहे. जर आपण आपल्या भारताचा विचार केला  तर आपल्याकडे शेतीमध्ये विविध पीक पद्धतीत बदल झाले त्यामुळे उत्पादनात वाढ झाली. परंतु आपल्याकडील शेतकऱ्यांनी तिकडे उत्पादनात वाढ करीत असताना मात्र असलेल्या सिंचन पद्धतीमध्ये बदल  केला नाही. आज जर आपण विचार केला तर बहुसंख्य ठिकाणी पाटपाणी दिले जाते.

नक्की वाचा:नाद नाय करायचा! 75 दिवसात 5 एकर मधून या पिकाने दिले तब्बल 13 लाख रुपयांचे उत्पादन

त्यामुळे अजूनही कार्यक्षम पाण्याचा वापर आपल्याकडे होताना दिसत नाही. त्यामुळे  शेतीसाठी कार्यक्षम  पाण्याचा वापर वाढवण्यासाठी काय करता येईल हे महत्त्वाचे आहे. या पार्श्वभूमीवर मुंबई येथील विलेपार्ले येथे बीजे सभागृहात ब्रह्मा रिसर्च फाउंडेशन या मुंबई येथील स्ट्रॅटेजिक रिसर्च थिंक टँक यांनी आयोजित केलेल्या इंडियावॉटर विजन 2040 अँड बियाँड या जल परिषदेमध्ये पाण्याचे महत्त्व आणि संवर्धन पटवून देण्यासाठी विविध पैलू ने विचार मांडण्यात आले. या जलपरीशदेमध्ये शेतीसाठी पाण्याचा वापर हा मुद्दा केंद्रस्थानी राहिला.

 इस्राईल  मधील शेतीसाठी पाण्याचे नियोजन

 आपल्याला माहित आहेच कि इस्राईलने शेतीमध्ये अभूतपूर्व अशी प्रगती केलेली आहे. अगदी छोट्या छोट्या गोष्टींवर परिणाम कारक नियोजन करून योग्य व्यवस्थापनाने शेती क्षेत्र समृद्ध केले आहे. या देशाने दुष्काळावर मात करता यावी यासाठी पाच मोठे भूमिजल पृथ्थकरण प्रोजेक्ट सुरू केले.

यामध्ये घरगुती वापरासाठी जे पाणी लागते त्यापैकी 75 टक्के पाण्याची निर्मिती केली जाते. या घरगुती वापरातून जे सांडपाणी असते त्याच्या नियोजनावर इस्राईलने भर दिला. जर इस्राईल राष्ट्राचे जलव्यवस्थापन नीती पाहिली तर ती संपूर्णपणे सांडपाण्याशी निगडित आहे.

नक्की वाचा:फवारणी कशी करावी? एक उत्तम उदाहरण

जमिनीतील पाण्याचा साठा शाश्वत करायचा असेल तर तर भूगर्भामधील पाण्याचा संचय वाढवणे खूपच महत्त्वाचे आहे त्यासाठी पडणारा पावसाचा प्रत्येक थेंब जमिनीत जिरवणे महत्त्वाचे असल्याचे इस्राईलचे महा वाणिज्य दूत कोब्बी शोशानी यांनी सांगितले आहे. इस्राईल या देशाने शेतीसाठी असलेल्या सिंचन पद्धतीमध्ये खूप बदल केलेत. ठिबक सिंचनाचा शोध तर इस्रायलने लावलाच परंतु संपूर्ण शेती क्षेत्र पूरसिंचनातून सूक्ष्म सिंचनाखाली वळवले. 

तसेच शेतीसाठी पाण्याचा पुनर्वापर करण्यावर भर दिला. तसेच शेतकऱ्यांना हे पुनर्वापर केलेले पाणी वापरावे यासाठी धोरणात्मक निर्णय म्हणून  शेतकऱ्यांना प्रोत्साहित केले. अशाच प्रकारचे बदल भारतातील शेती व्यवसायात होणे महत्त्वाचे आहे असे मत जल परिषदेत व्यक्त करण्यात आले.

English Summary: can benificial of water management planing of israil for india agriculture sector
Published on: 13 April 2022, 09:09 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)