1. बातम्या

मंत्रिमंडळ उपसमिती निर्णय! निकषांमध्ये बसत नसताना देखील अतिवृष्टीमुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांना 755 कोटी रुपयांची मदत

जून ते ऑगस्ट 2022 या कालावधीमध्ये महाराष्ट्रात जो काही पाऊस झाला या पावसामुळे शेतीपिकांचे खूप नुकसान झाले. या अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीच्या सरकारी मदतीसाठी निकषांमध्ये बसत नसताना ही बाधित झालेल्या शेतकऱ्यांना विशेष बाब म्हणून 755 कोटी रुपयांची मदत देण्याचा निर्णय राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रिमंडळ उपसमितीने गुरुवारी घेतला.

पाटील रत्नाकर अशोक
पाटील रत्नाकर अशोक
taking decision to compansation package

taking decision to compansation package

जून ते ऑगस्ट 2022 या कालावधीमध्ये महाराष्ट्रात जो काही पाऊस झाला या पावसामुळे शेतीपिकांचे खूप नुकसान झाले. या अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीच्या सरकारी मदतीसाठी निकषांमध्ये बसत नसताना ही बाधित झालेल्या शेतकऱ्यांना विशेष बाब म्हणून 755 कोटी रुपयांची मदत देण्याचा निर्णय राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रिमंडळ उपसमितीने गुरुवारी घेतला.

नक्की वाचा:दिलासादायक! पुणे बाजार समितीमध्ये वटाण्याला मिळाला तब्बल 15 हजारांचा कमाल भाव

या निर्णयाचा फायदा राज्यातील 6 लाख शेतकऱ्यांना होणार आहे. जर एसडीआरएफच्या निकषाप्रमाणे मदतीचे वाटप केले तर ती अवघी एक हजार 500 कोटी रुपये राहिले असती.

परंतु आता निकषांच्या पलीकडे जाऊन अधिक मदत करण्याच्या निर्णयामुळे शेतकऱ्यांना भरीव लाभ मिळत असे देखील मुख्यमंत्री शिंदे म्हणाले. जर आपण एकंदरीत परिस्थिती पाहिली तर बऱ्याच ठिकाणी झालेल्या अतिवृष्टीमुळे खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

परंतु अतिवृष्टी साठी विहित करण्यात आलेल्या निकषांमध्ये बसत नसतानाही  या झालेल्या नुकसानीपोटी मदतीचा प्रस्ताव विभागीय आयुक्त औरंगाबाद, अमरावती ते सोलापूर जिल्हाधिकाऱ्यांनी शासनाकडे सादर केले होते.

नक्की वाचा:आजच्या मंत्रिमंडळ बैठकीतील निर्णय! पोलिसांची 20 हजार पदे भरणार, आणखी बरंच काही….

एवढेच नाहीतर औरंगाबाद, जालना, बीड, लातूर, परभणी आणि उस्मानाबाद या जिल्ह्यातील जवळजवळ चार लाख 38 हजार 489 हेक्टर क्षेत्र तर यवतमाळ जिल्ह्यातील 36 हजार 711 हेक्टर सोलापुरातील अतिवृष्टीग्रस्त

शेतकऱ्यांना 755 कोटी रुपयांची निधीची मदत देण्याचा प्रस्ताव मंत्रिमंडळ उपसमितीने मान्य केला. हे अतिवृष्टी बाधित क्षेत्र वरील जिल्हे मिळून एकूण 5 लाख 49 हजार 643.31 हेक्टर असून त्यासाठी एकूण निधी सुमारे 755 कोटी मंजूर करण्यात आला.

नक्की वाचा:आनंद अँग्रो केअरच्या वर्धापन दिनानिमित्त शेतकरी मेळावा

English Summary: cabinet take decision to give 755 crore rupees compansation to farmer Published on: 30 September 2022, 08:54 IST

Like this article?

Hey! I am पाटील रत्नाकर अशोक. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters