News

छत्रपती संभाजीनगर मधील स्मार्ट सिटी योजनेअंतर्गत मराठवाडा मुक्ती संग्रामच्या अमृत महोत्सव निमित्त या बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. सात वर्षानंतर मराठवाड्यामध्ये ही मंत्रिमंडळ बैठक होणार असून मराठवाड्याच्या आठ जिल्ह्यांसाठी कॅबिनेटमध्ये विविध निर्णय होण्याची शक्यता आहे.

Updated on 15 September, 2023 11:08 AM IST

Chhatrapati Sambhajinagar News :

छत्रपती संभाजीनगर मध्ये उद्या (दि.१६) राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वाची बैठक पार पडणार आहे. सात वर्षानंतर छत्रपती संभाजीनगर मध्ये राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. या बैठकील संपूर्ण मंत्रिमंडळातील मंत्री उपस्थित असणार आहेत. तसेच महत्त्वाचे सचिव देखील असणार आहेत.

या मंत्रिमंडळाच्या बैठकीसाठी छत्रपती संभाजीनगर मध्ये जोरदार तयारी सुरु आहे. या बैठकीसाठी जवळपास ३०० वाहनांचा ताफा असणार आहे. छत्रपती संभाजी नगर मध्ये मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाच्या पार्श्वभूमीवर उद्या मंत्रिमंडळाची बैठक पार पडणार आहे.

छत्रपती संभाजीनगर मधील स्मार्ट सिटी योजनेअंतर्गत मराठवाडा मुक्ती संग्रामच्या अमृत महोत्सव निमित्त या बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. सात वर्षानंतर मराठवाड्यामध्ये ही मंत्रिमंडळ बैठक होणार असून मराठवाड्याच्या आठ जिल्ह्यांसाठी कॅबिनेटमध्ये विविध निर्णय होण्याची शक्यता आहे. तसंच प्रलंबित फाईल आणि मराठवाड्यातील प्रश्न मार्गी लावण्यासाठी मंत्रालयामध्ये अधिकाऱ्यांची लगबग सुरु आहे. बैठकीच्या पार्श्वभूमीवर छत्रपती संभाजीनगरमधील हॉटेल आणि विश्रामगृह आरक्षित करण्यात आली आहेत.

बैठकीबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की, आज संध्याकाळी मी छत्रपती संभाजीनगरला पोहोचत आहे. मुख्यमंत्री देखील आज त्यांची कामे रात्री तिकडे पोहचत आहेत. देवेंद्र फडणवीस पण येतील. उद्या आणि परवा दोन दिवसाच्या करता संपूर्ण मंत्रिमंडळ आणि अधिकारी जे मंत्रिमंडळाच्या बैठकीसाठी लागणर आहेत. ते सर्वजण तिथे असणार आहेत.

दरम्यान, सात वर्षानंतर पुन्हा एकदा १६ सप्टेंबरला छत्रपती संभाजीनगरमध्ये मंत्रिमंडळाची बैठक होत आहे. १७ तारखेला मराठवाडा मुक्ती संग्रामाचा ७५ वा अमृत महोत्सव दिवस आहे. त्याकरता अनेक कार्यक्रमांचे आयोजन प्रशासनाकडून करण्यात आलेले आहे. तसंच मंत्रिमंडळाची बैठक असल्यामुळे जय्यत तयारी देखील करण्यात आली आहे.

English Summary: Cabinet meeting to be held in Marathwada after 7 years
Published on: 15 September 2023, 11:02 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)