सध्या भाजीपाल्याची शेती करणाऱ्यांना चांगले दिवस आले आहेत. बाजारा भाजीपाल्याची मागणी वाढली असून दरही चांगला मिळत आहे. गेल्या काही दिवसाआधी दिल्लीमध्ये हिरवी मिरची, टोमॉटोला जोरदार भाव होता. आता कोबीला जबरदस्त दर मिळताना दिसत आहे. नाशिकमधील बाजारात कोबीचे दर उंचावले आहेत. नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये विविध भाजीपाला यांची मोठ्या प्रमाणात आवक होते. आज कोबीची जवळ-जवळ ८३० क्विंटल आवक झाली. कोबीला २०८५ ते ४ हजार १६५ रुपये प्रति क्विंटल दर मिळाला. जर सरासरीचा विचार केला तर ही सरासरी २९१५ रुपये इतका राहिला. कोबीच्या पुरवठ्यापेक्षा मागणी जास्त असल्याने कोबीच्या दरात चांगल्या प्रकारे तेजी असल्याचे माहिती बाजार समितीच्या सूत्रांनी दिली.
अतिपावसाने सगळीकडे भाजीपाल्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. त्याचा परिणाम हा थेट पुरवठ्यावर झाला. मागणीच्या मानाने भाजीपाल्याचा पुरवठा हा कमी असल्याने भाजीपाला चांगला दर मिळत आहे. जर भाजीपाला पिकांमध्ये इतर ठिकाणचा विचार केला तर वांग्याची आवक १७२ क्विंटल होती. त्यास प्रति क्विंटल ७ हजार ते ११ हजार असा दर मिळाला. ढोबळी मिरची २०० पाच क्विंटल आवक झाली. ढोबळी मिरचीला हे ६,२५० ते ९३२५ असा दर मिळाला.
जर ढोबळी मिरचीच्या सरासरीचा विचार केला तर ८०६० प्रति क्विंटल भाव मिळाला. कारल्याची ३७३ क्विंटल आवक झाली, तरी कारल्याला प्रति क्विंटल २५०० ते ४ हजार १६५ रुपये भाव मिळाला. सर्वसाधारण कारल्याचा दर हा ३,३३५ रुपये राहिला. भेंडीच्या ५९ क्विंटल आवक झाली. भेंडीला प्रति क्विंटल २,९०० ते ३,९५० पर्यंत दर मिळाला. सरासरी दर हा ३,३३५ रुपये राहिला. उन्हाळी कांद्याची आवक २९९ क्विंटल होऊन त्याच २,५०० ते ५,२०० रुपये दर मिळाला. उन्हाळी कांद्याचे सरासरी ही ४०५० राहिली. लाल पोळ कांद्याचे आवक ७० क्विंटल होऊन त्यास २,१५० ते ४ हजार रुपये असा दर मिळाला. सरासरी दर हा ३, ०५० रुपये राहिला.
फळांच्या भावातही वाढ
फळांमध्ये डाळिंबाची आवक ८४९ क्विंटल होऊन त्यालाही ३ हजार ते ९ हजार ५०० रुपये रुपये दर मिळाला. केळीच्या आवक ५० क्विंटल झाली. केळीलाही ४०० रुपये ते १ हजार रुपयांपर्यंतचा भाव मिळाला. केळीच्या सरासरी भाव हा ७५० रुपये राहिला. टरबुजची आवक २५ क्विंटल होऊन त्याच ८०० ते २ हजार रुपये पर्यंतचा भाव मिळाला. पपईची आवक २५ क्विंटल झाली असून ८०० ते १५०० रुपये दर मिळाला. मागणीच्या मानाने पुरवठा अत्यल्प असल्याने भाजीपाला आणि फळपिकांना चांगल्यापैकी दर मिळत असल्याने शेतकरी वर्गात समाधान व्यक्त करण्यात येत आहे.
Published on: 05 November 2020, 05:55 IST