आपला देश आपला अभिमान असे म्हणत वडिलांनी मुलाचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी पाच एकर जमीन विकली आहे. वेटलिफ्टिंग खेळात मुलाचे ऑलिम्पिक स्पर्धेत भारताला सुवर्णपदक मिळवून देण्याचे स्वप्न करण्यासाठी वडाळी (ता. श्रीगोंदा) येथील शेतकरी दिगंबर व नंदाबाई बायकर यांनी पाच एकर जमीन विकली आहे.
घरीच तयार केली व्यायामशाळा
मुलासाठी आतापर्यंत ६० लाख खर्च केले आहेत. सरावात खंड पडू नये यासाठी घरीच व्यायामशाळा तयार केली आहे. वडाळी येथील गणेश बायकर हा लोणी काळभोर येथे एमएची पदवी घेत आहे. तसेच तो बालेवाडी (पुणे) येथील राष्ट्रीय क्रीडा प्रबोधिनीत प्रा. उज्ज्वला यांच्या मार्गदर्शनाखाली वेटलिफ्टिंगचे धडे घेत आहे. त्याने २०२० पातळीवर अनेक पदके जिंकली आहेत. खेलो इंडिया स्पर्धेत ६९ किलो वजनी गटात २५७ किलो वजन उचलून सुवर्णपदक पटकाविले आहे. यंदा विभागीय स्पर्धेत २६३ किलो वजन उचलले आहे.
आणखी पाच एकर विकण्याची तयारी
गणेश बायकर आई-वडिलांच्या श्रमाची जाण ठेवून वेटलिफ्टिंगचा जोरदार सराव करत आहे. ऑलिम्पिक पदक विजेत्या मीरा चानू या आयडॉल असल्याचे वेटलिफ्टर गणेश बायकर याने सांगितले. वेटलिफ्टिंगचा सर्व करण्यासाठी आणखी पैश्याची गरज पडली तर आणखी पाच एकर जमीन विकणार असल्याची माहिती गणेशच्या वडिलांनी दिली. राष्ट्रीय पातळीवर सुवर्णपदक जिंकण्यासाठी तो सध्या दररोज सहा तास सराव करीत आहे. पुणे विद्यापीठाचा बेस्ट वेटलिफ्टर अवॉर्ड गटात मिळाला आहे.
Published on: 17 February 2022, 03:25 IST