News

शेतकऱ्यांना परदेशात अभ्यास दौऱ्याचे आमिष दाखवून त्यांची फसवणूक केल्याची घटना समोर आली आहे. यामुळे शेतकऱ्यांना एकच धक्का बसला आहे. इस्रायलला शेतीच्या अभ्यास दौऱ्यासाठी घेऊन जाण्याच्या आमिषाने पुण्यातील 'ॲग्रिकल्चरल ग्रॅज्युएट' संस्थेने राज्यातील ३० शेतकऱ्यांना ५१ लाखांचा गंडा घातल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.

Updated on 15 May, 2023 9:24 AM IST

शेतकऱ्यांना परदेशात अभ्यास दौऱ्याचे आमिष दाखवून त्यांची फसवणूक केल्याची घटना समोर आली आहे. यामुळे शेतकऱ्यांना एकच धक्का बसला आहे. इस्रायलला शेतीच्या अभ्यास दौऱ्यासाठी घेऊन जाण्याच्या आमिषाने पुण्यातील 'ॲग्रिकल्चरल ग्रॅज्युएट' संस्थेने राज्यातील ३० शेतकऱ्यांना ५१ लाखांचा गंडा घातल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.

यामुळे आता याची चौकशी सुरु आहे. सांगोला तालुक्यातील गौडवाडीचे पाच ते सहा शेतकरी डाळिंब शेती करत आहेत. त्यांच्या काही शेतकरी मित्रांनी इस्रायल दौरा काढण्यासाठी अभ्यास दौऱ्याचे नियोजन करणाऱ्या पुणे येथील ॲग्रिकल्चरल ग्रॅज्युएट संस्थेशी संपर्क साधला. त्यांना शेतीच्या अभ्यासासाठी दौरा करायचा होता.

असे असताना येथील ३२ शेतकऱ्यांच्या गटाने दौऱ्यासाठी सहमती दाखवली. प्रत्येकी सुमारे एक लाख ६० हजार रुपयांमध्ये इस्रायलचा सहा दिवसांचा अभ्यास दौरा आयोजित करण्यात आला. मात्र त्यांना दौऱ्यावर नेले गेले नाही. यामुळे त्यांची फसवणूक झाली.

शिमला मिरचीने केले मालामाल, पैठणच्या शेतकऱ्याला लाखोंचे उत्पादन..

त्यांना व्हिसा काढण्यासाठी तांत्रिक अडचणी निर्माण झाल्याचे कारण सांगत दौरा पुढे ढकलल्याचे कडूस-पाटीलने सांगितले. त्यानंतर आज अखेर शेतकऱ्यांना अभ्यास दौऱ्यावर नेले नाही. 

आता पीक कर्जासाठी 'सिबिल स्कोअर' मागणाऱ्या बँकांवर फौजदारी गुन्हा दाखल होणार

याबाबत आटपाडी पोलिस ठाण्यात या संस्थेच्या महेश भाऊसाहेब कडूस-पाटील बिजलीनगर, चिंचवड, पुणे याच्याविरोधात नानासाहेब ऊर्फ अण्णा दादा गडदे (रा. गौडवाडी, ता. सांगोला, जि. सोलापूर) यांनी फिर्याद दिली आहे. यामळे पोलीस तपास करत आहेत.

पुणे जिल्हा बँकेकडून शेतकऱ्यांना एका महिन्यात १३०० कोटींचे पीककर्ज, शेतकऱ्यांना दिलासा..
नाफेड अंतर्गत पूर्णा खरेदी विक्री संघाकडून हमीदराने चौदा हजार क्विंटल हरबरा खरेदी
उसाची शेती करताना माती परीक्षणाकडे दुर्लक्ष करू नका...

English Summary: By luring Israel to study agriculture, an organization in Pune extorted 51 lakhs from farmers
Published on: 15 May 2023, 09:24 IST