News

आजच्या युगात शेतकरी वर्ग भाजीपाला लागवडीकडे ओळत आहेत. भाजीपाला हे कमी वेळेत जास्त उत्पादन देतात, मात्र त्यासाठी योग्य पाण्याचे नियोजन आणि पोषक वातावरणाची गरज लागते. भाज्यांचे उत्पादन तर जास्त निघत आहे मात्र शेतकऱ्यांना जशी बाजारपेठ हवी आहे तशी बाजारपेठ भेटत नसल्यामुळे शेतकरी आहे त्या दरात भाजीपाल्याची विक्री करत आहेत.

Updated on 03 January, 2022 8:52 AM IST

आजच्या युगात शेतकरी वर्ग भाजीपाला लागवडीकडे ओळत आहेत. भाजीपाला हे कमी वेळेत जास्त उत्पादन देतात, मात्र त्यासाठी योग्य पाण्याचे नियोजन आणि पोषक वातावरणाची गरज लागते. भाज्यांचे उत्पादन तर जास्त निघत आहे मात्र शेतकऱ्यांना जशी बाजारपेठ हवी आहे तशी बाजारपेठ भेटत नसल्यामुळे शेतकरी आहे त्या दरात भाजीपाल्याची विक्री करत आहेत.

भाजीपाल्याचे उत्पादन हे शेतकऱ्यांचे हातात आहे मात्र दर हे त्यांच्या हातात नसल्याने शेतकऱ्यांना संकटांना सामोरे जावे लागत आहे. भाजीपाला हे हंगामी पीक असून बाजारामध्ये कोणते दर ठरवायचे याचे मोठे आव्हान शेतकऱ्यांसमोर आहे. निर्यात वाढवून शेतकरी उत्पन्न वाढवु शकतात मात्र शेतकऱ्यांना योग्य माहिती नसल्यामुळे ते पुढची प्रक्रिया करत नाहीत. भाजीपाला निर्यात कसा करायचा याची माहिती शेतकऱ्यांना असली पाहिजे.

आयात निर्यात परवाना :-

भाजीपाला तसेच इतर कोणताही शेतीमाल निर्यात करायचा असेल तर त्यासाठी लागतो तो आयात - निर्यातीचा परवाना. त्यासाठी सर्वात आधी तुम्हाला परवाना काढावा लागणार आहे. आयात निर्यातीचा परवाना काढण्यासाठी नोंदणी संस्थचे पत्र तसेच भारत सरकारच्या आयकर विभागाकडून भेटलेला खाते क्रमांक तसेच ज्या व्यक्तीला परवाना काढायचा आहे त्याचा पासपोर्ट साईझचा फोटो, सहसंचालक विदेशी व्यापाऱ्यांच्या नावे डिमांड ड्राफ्ट आणि शेवटी म्हणजे ३० रुपयांचा पोस्टल स्टॅम्प इ. सर्व कागदपत्रे परवाना काढण्यासाठी लागणार आहेत.

शेतीमालाच्या सुरक्षतेचे हमीपत्र :-

जर तुम्हाला परदेशात शेतीमाल निर्यात करायचा असेल तर त्यासाठी लागणारे सर्वात महत्वाचे कागदपत्रे म्हणणे शेतीमाल सुरक्षित असल्याचे हमीपत्र. हे हमीपत्र काढायचे असेल तर त्यासाठी सुद्धा आवश्यक असणारी कागदपत्रे पुढीलप्रमाणे. आरोग्यविषयक प्रमाणपत्र तसेच पॅक हाऊस प्रमाणपत्र तसेच सॅनेटरी प्रमाणपत्र आणि ग्लोबल गॅप हे प्रमाणपत्र. दिलेली सर्व कागदपत्रे तुम्हाला आयात - निर्यात संस्थेकडे जमा करावी म्हणजेच परवाना निघेल.

उत्पन्नही दुपटीने :-

भारतात पिकवल्या जाणाऱ्या भाजीपाल्याची परदेशात मोठ्या प्रमाणावर मागणी आहे. जर सेंद्रिय पद्धतीने शेती करून तुम्ही भाजीपाल्याचे उत्पादन घेत असाल तुम्हाला याचा जास्त फायदा होईल. स्थानिक बाजारपेठेपेक्षा तुम्ही भाजीपाल्याची निर्यात केली तर तुम्हाला दुपटीने फायदा मिळेल.

English Summary: By exporting vegetables, you can get double the price, but you will need the necessary documents to export
Published on: 03 January 2022, 01:29 IST