Sangli News - प्रतिक्षा काकडे
पाच किलो साखर विकत घ्या आणि एक कोटी मिळवा, असा लकी ड्रॉ केंद्र सरकारने सुरु केला आहे. किराणा दुकानातून दोनशे रुपयांची खरेदी करा आणि तब्बल एक कोटी रुपये जिंका असा भन्नाट फंडा केंद्र सरकारने जाहीर केलाय. जीएसटी चुपकेगिरी पकडण्यासाठी ही कल्पना केंद्र सरकारने सुरु केली आहे.
एक सप्टेंबर पासून देशभरात याची अंमलबजावणी करण्यात येणार आहे. यासाठी स्वतः केंद्र सरकारच लकी ड्रॉ करणार आहे. तर यासाठी मेरा बिल मेरा अधिकार हे ॲप घ्यावा लागेल. त्यावर एक ग्राहक एका महिन्यात जास्तीत जास्त २५ बिले अपलोड करु शकतो. प्रत्येक बिलाची किंमत दोनशे रुपये असावी या बिलातून मासिक आणि त्रैमासिक लकी ड्रॉ काढला जाणार आहे.
छोटी खरेदी करताना, किराणा दुकानात, हॉटेलात, मंगल कार्यालय, केटरिंग सेवा घेताना सहसा बिले घेतली जात नाहीत. त्याचा गैरफायदा काही व्यावसायिक उचलतात. व्यवहार लपवून जीएसटी बुडवतात. जीएसटीचे बिल घेतले नाही तर स्वस्तात माल मिळतो म्हणून ग्राहकही पक्की बिले मागत नाहीत. अनेक व्यावसायिक ग्राहकांकडून कराची वसुली करतात. पण पक्के बिल देत नाहीत. अशा करचुकीवेकरांना चाप देण्यासाठी केंद्र सरकारने ही योजना आणली आहे.
Published on: 25 August 2023, 12:30 IST