News

सध्या अनेकजण आपला स्वत:चा व्यवसाय सुरु करत आहेत. पण काहींना मात्र कोणता व्यवसाय सुरू करायचा याची कल्पना नसते. अशा लोकांनासाठी हा लेख उपयुक्त आहे. आज आपण या लेखातून अनेक व्यवसायाची माहिती घेणार आहोत.

Updated on 08 January, 2021 11:33 AM IST

सध्या अनेकजण आपला स्वत:चा व्यवसाय सुरु करत आहेत. पण काहींना मात्र कोणता व्यवसाय सुरू करायचा याची कल्पना नसते. अशा लोकांनासाठी हा लेख उपयुक्त आहे. आज आपण या लेखातून अनेक व्यवसायाची माहिती घेणार आहोत.

आरोग्य संवर्धन-

कोरोनाने लोकांना निरोगी जीवनाचे आणि आरोग्याचे महत्व पटवून दिले. शारीरिक आरोग्य हे किती महत्वाचे आहे, याबाबत लोकांमध्ये जागरूकता आली. आरोग्य आणि विविध रोगांचा सामना करण्यासाठी शरीराची रोगप्रतिकारशक्ती मजबूत असणे फार महत्त्वाचे असते. हे लोकांना समजले. जर आपण पाहिले तर निसर्गामध्ये असे काही गुपित घडले आहेत. त्यामध्येच आपल्या निरोगी आयुष्याचे गुरुकिल्ली आहे. त्यामुळे सगळीकडे लोक आता नैसर्गिक गोष्टींकडे वळताना दिसत आहेत. लोक रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी विविध प्रकारच्या नैसर्गिक गोष्टींचा वापर करीत आहेत.

हेही वाचा :एक रुपया असला तरी तुम्ही बनू शकतात करोडपती; वाचा काय आहे हा प्रकार

जसे घरा-घरात हळदीचा काढा पिणे नित्याचे झाले आहे. प्राणायम, योगासने करण्याकडे लोकांचा कल वाढला आहे. त्यामुळे या गोष्टींकडे जर आपण व्यवस्थित विचार करून पाहिले तर या क्षेत्राला एक व्यावसायिक संधी म्हणून पाहता येईल. प्रतिकारशक्ती वाढवणारे आयुर्वेदिक औषधांच्या विक्रीसंबंधी थोडक्यात सुरू करता येऊ शकते. उदा. हळदीच्या काढण्याची पावडर पॅक स्वरूपात विकणे हा चांगला व्यवसाय नावारूपास येत आहे. तसे योगासन, प्राणायम यांच्या ऑनलाईन किंवा ऑफलाईन क्लासेसही सुरू करता येऊ शकतात.

फिटनेस ट्रेनिंग व साहित्य विक्री-  

सध्या प्रत्येकजण आपल्या फिटनेसकडे लक्ष देऊ लागले आहे. घरी बसून बऱ्याच जणांना शारीरिक व्याधी जडतात. त्यामुळे शरीर वाढते हो पर्यायी वेळी आजारांना निमंत्रण मिळते. त्यामुळे फिटनेस उत्तम असणे हे फार महत्वाचे आहे. यासाठी प्रत्यक्ष किंवा आणली माध्यमातून ट्रेनिंग देणे हे दोन्ही मार्ग सोयीचे आहेत. जर तुम्ही फिटनेस क्षेत्रात काम करण्यात पारंगत असाल तर तुम्ही या क्षेत्राला व्यवसाय संधी म्हणून पाहू शकता. फिटनेससंबंधी साहित्य विक्रीसाठी सुद्धा चांगली संधी आहे.

 

स्वच्छ शेतमाल-

सध्या शेतीमधून रासायनिक युद्ध भाजीपाला येतो. त्याच्यामुळे आरोग्याकडे विशेष लक्ष देणारे लोक केमिकल मुक्त आणि स्वच्छ भाजीपाला आणि फळे यांची मागणी करताना दिसतात. लोक आता नैसर्गिक गोष्टींना प्राधान्य देताना दिसतात. यामध्ये जर व्यवसायाचा विचार केला तर शेतकऱ्यांकडून भाजीपाला घेऊन त्यावर कोणत्याही प्रकारची रासायनिक प्रक्रिया न करता ग्राहकांपर्यंत पोहोचविणे हा एक चांगला व्यवसाय होऊ शकतो.

ऑनलाईन क्लासेस-

कोरोना काळामध्ये नवीन प्रकारचा व्यवसायचा ट्रेंड आला आहे. आणि बर्‍याच दिवसात ट्रेन चालूच राहील. ऑनलाइन क्लासेस लोकांना जास्त सोयीचे वाटत असल्याने तुमच्यासाठी ही मोठे मार्केट उपलब्ध होऊ शकते. कोणीही कुठल्याही विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करू शकतो. त्यामुळे ऑनलाईन क्लासेसचा विचार जरूर करावा कारण या क्षेत्रात चांगल्या संधी उपलब्ध आहेत.

हेही वाचा : स्वतःचा व्यवसाय सुरु करण्यासाठी या पाच पर्यायांचा विचार करा

स्वच्छता आणि सुरक्षा संबंधित सेवा-

 पुढील काही दिवस सॅनिटेशन सर्विस चांगली मार्केट राहील, घर, वाहने सेंड टाईप करण्यासाठी चांगली मागणी आहे. मास्क, क्लोज, गाऊन, सैनी टायझर, साबण यासारख्या प्रॉडक्टच्या विक्रीला चांगली मागणी आहे. सध्या या क्षेत्रात बरेच लोक उतरले आहेत. या वस्तूंचे उत्पादन करण्यापेक्षा त्यांचे ट्रेडिंग करणे फायद्याचे राहील. कारण उत्पादनासाठी मोठी गुंतवणूक लागेल आणि या उत्पादनांची मागणी एका मर्यादेपर्यंत खाली येणार आहे. त्यामुळे मार्केटमध्ये या वस्तूंचे स्टॉकचा फुगवटा तयार होऊ शकतो. त्यामुळे ट्रेडिंगकडे लक्ष पुरवणे गरजेचे आहे. स्थानिक मार्केटमध्ये काही मर्यादेपर्यंत माल कसा विकला जाईल आणि काही मर्यादापर्यंत त्याला मागणी राहणार आहे.

व्हर्च्युअल ऑफिस-

नवीन व्यवसाय ना ऑफिस हवी असते. प्रत्येकांची आर्थिक ताकत तेवढी नसते म्हणून प्रत्येकाला चांगले ऑफिस सेटअप करता येणे शक्य होत नाही. जराशा व्यवसायिकांना जर तुम्ही वर्चुअल किंवा शेयर्ड ऑफिसची सेवा उपलब्ध करून दिली तर व्यवसायात चांगली संधी मिळू शकते.

खाद्यपदार्थ घरपोच सेवा-

स्वतः बनवलेले खाद्यपदार्थ घरपोच पुरवणे हा एक चांगला व्यवसाय आहे. हॉटेल फूड व्यतिरिक्त घरगुती स्तरावर बनवलेल्या खाद्यपदार्थांना आता मागणी चांगल्याप्रकारे वाढत आहे. त्यामुळे स्थानिक शहरात अतिशय कमी खर्च करून हा व्यवसाय सुरू करता येऊ शकतो.

प्रोजेक्ट ॲडव्हायझर-

प्रोजेक्ट ऍडव्हायझरी म्हणजे कोणताही व्यवसाय उभा करण्यासाठी लागणारे मार्गदर्शन करणे. व्यवसाय मार्गदर्शन अनुभव मार्गदर्शक असून प्रोजेक्ट ॲडव्हायझर होण्यासाठी अनुभवापेक्षा सर्व टेक्निकल बाबींचे ज्ञान महत्त्वाचे असते. त्यामुळे व्यवसाय संबंधीच्या तांत्रिक माहिती ५ सहा महिन्यात संपूर्ण शिकून घेऊन तुम्ही प्रोजेक्ट ॲडव्हायझर म्हणून व्यवसाय सुरू करू शकतात. एकदा चांगले प्रोजेक्ट हाती घ्यायला लागले मग आपोआपच क्लाइंट मिळाला लागतात. या व्यवसायासाठी सुरुवातीला मार्गदर्शन आवश्यक असते.

 

व्यवसाय संबंधित सेवा पुरवणे-

नवीन व्यवसायचे प्रमाण वाढत असल्याने या व्यवसायांसाठी प्राथमिक सेवा पुरवणे फार महत्वाचे असते. हा एक चांगला व्यवसाय होऊ शकतो. प्राथमिक सेवांमध्ये व्यवसाय रजिस्ट्रेशन, लायसन्स, विविध डॉक्युमेंटेशन, बँकिंग, डिझाईनिंग ब्रँडिंग, उत्पादनांच्या जाहिरातीसाठी चांगले मार्ग उपलब्ध आहे. तुमचा व्यवसाय क्लायंट बेस चांगला असेल तर तुम्ही या व्यवसायात चांगला जम बसवू शकतात.

 माहिती स्त्रोत- उद्योजक मित्र

English Summary: Businesses that can be done with less investment, will make a lot of money
Published on: 08 January 2021, 11:28 IST