1. बातम्या

Business Idea: 'या' पिकासाठी करा फक्त अडीच लाख रुपयांची गुंतवणूक; होईल 1.5 कोटींची कमाई

प्रत्येकाला कमी गुंतवणुकीतून जास्त नफा कमवायचा आहे. जर शेतकऱ्यांना शेतीतून अधिक नफा कमवायचा असेल तर परंपरागत पिकांऐवजी दुसऱ्या पिकाची लागवड करावी लागेल. अशी पीक आहे, ते म्हणजे सफेद चंदन. या पिकातून शेतकरी नक्कीच मोठी कमाई करू शकतील.

भरत भास्कर जाधव
भरत भास्कर जाधव
सफेद चंदनाची शेती

सफेद चंदनाची शेती

प्रत्येकाला कमी गुंतवणुकीतून जास्त नफा कमवायचा आहे. जर शेतकऱ्यांना शेतीतून अधिक नफा कमवायचा असेल तर परंपरागत पिकांऐवजी दुसऱ्या पिकाची लागवड करावी लागेल. अशी पीक आहे, ते म्हणजे सफेद चंदन. या पिकातून शेतकरी नक्कीच मोठी कमाई करू शकतील. चंदनाबरोबर शेतकरी दुसरी पिकेही घेऊ शकतात.  नीती आयोगाने सर्व राज्यांना त्यांच्या वनजमिनीवर व शेतीच्या जमिनीवर चंदन शेती व्यवसाय (sandalwood farming business idea) करावा. राज्यातील जनतेला त्यासाठी प्रेरित करावे, असेही सांगितले आहे.

जाणून घ्या कशाप्रकारे केली जाते चंदन शेती (how to do sandalwood Farming),

किती लागेल खर्च आणि किती होईल नफा 

जर तुम्ही एका एकरात सफेद चंदनाची शेती करत असाल तर यात तुम्हाला फक्त एक लाख रुपयांची गुंतवणूक करावी लागेल आणि यातून 60 लाख रुपयांची कमाई करू शकतात. याप्रकारे तुम्ही जर एका हेक्टरमध्ये म्हणजेच अडीच एकरात सफेद चंदनाची शेती करत असाल तर तुम्हाला अडीच लाख रुपयांचा खर्च येईल आणि यातून तुम्ही 1.5 कोटी रुपये कमावू शकतात.  भारतात सफेद चंदनाचे लाकडांना साधऱण 8 ते 10 हजार रुपये प्रति किलो असा दर मिळत आहे. तर परदेशात याचा दर 20 ते 25 हजार रुपयांपर्यंत असू शक्यतो.

नफा वाढण्यास अशा प्रकारे करा चंदनाची शेती

आपण अडीच एकरात साधरण 1.5 कोटी रुपयांची कमाई करू शकतो. परंतु जर तुम्ही चंदनाच्या शेतीसह अजून दुसरे पिकांची लागवड कराल आणि उत्पन्न घ्याल तर तुमचा नफा अजून वाढेल. अशा पिकांची पेरणी करा, ज्यातून चंदनाच्या झाडालाही फायदा होईल. यात तुम्ही तुरीची लागवड करू शकतात. यातून तुमचं उत्पन्न नक्कीच वाढेल. दरम्यान तुम्ही चंदनाची शेती करण्याचा विचार करत असाल तर त्याआधी तुम्ही कोणी जाणकारांची भेट घेऊन यातील बारकावे जाणून घ्यावे.

 

पांढर्‍या चंदनाची लागवड कशी होते?

सर्व प्रथम, आपण हे समजून घ्यावे लागेल की चंदन पिकापासून नफा मिळविण्यासाठी आपल्याला 12-15 वर्षे काळ प्रतीक्षा करावी लागेल. चंदनाच्या एका रोपाची किंमत साधरण 400 रुपये आहे. चंदनाच्य लागवडीचा सर्वात मोठा फायदा म्हणजे चंदनाला जास्त काळजी घेण्याची गरज नाही. तथापि, पहिल्या वर्षी आपल्याला चंदनच्या वनस्पतींची थोडी काळजी घेणे आवश्यक आहे. तसेच चंदन झाडाला जास्त पाण्याची आवश्यकता नसते. कोरडवाहू जमिनीवरही चंदनाची लागवड करून शेती फुलवता येते.

 

चंदनाचे उपयोग काय आहेत?

पांढर्‍या चंदनाची झाडे सदाहरित मानली जातात. त्यातून काढलेल्या तेल आणि लाकडापासून अनेक प्रकारच्या औषधी वस्तू बनवल्या जातात. या बरोबरच साबण, सौंदर्यप्रसाधने आणि परफ्युम इत्यादी बनवण्यासाठीही पांढर्‍या चंदनाचा उपयोग केला जातो, कारण त्या तेलाला उत्तम सुगंध आहे. चंदन देखील हवनसाठी मोठ्या प्रमाणात वापरला जातो. परदेशातही पांढर्‍या चंदनाची जोरदार मागणी आहे.

English Summary: Business Idea An investment of just Rs 2.5 lakh for this crop will earn Rs 1.5 crore Published on: 24 July 2021, 12:02 IST

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters