उसाच्या शेताला आग लागून तब्बल 32 एकर ऊस जळून खाक झाल्याची दुर्दैवी घटना उघडकीस आली आहे. पुणे जिल्ह्यातील इंदापूर तालुक्यात ही धक्कादायक घटना घडली आहे. इंदापूर तालुक्यातील वरकुटे बुद्रुक परिसरातील शेताला लागलेल्या आगीत तब्बल 32 एकर ऊस जळून खाक झाला आहे. यामध्ये शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे.
32 एकर ऊसाला आग लागल्याने आगीने रौद्ररूप धारण केले होते. परिसरात सर्वत्र आगीचे लोळ पसरल्याचे पहायला मिळाले. ही आग नेमकी कशामुळे लागली याची माहिती समोर आलेली नाही. उसाच्या शेताला आग लागल्याची घटना वरकुटे बुद्रुक परिसरामध्ये घडली आहे. या आगीमध्ये तब्बल 32 एकर ऊस जळून खाक झाला. घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. आग लागून झालेल्या नुकसानाचा पंचनामा करण्यात आला आहे.
आग लागल्याचे कळताच स्थानिकांनी घटनास्थळाकडे धाव घेतली. आग नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न केला. स्थानिकांच्या मदतीने आठ ते दहा एकर ऊस वाचवण्यात यश आले आहे. ऊससामध्ये सुकलेला पालापाचोळा असतो. त्यामुळे ही आग चांगलीच भडकली आणि सगळा ऊसच आगीच्या भक्ष्यस्थानी पडला. पावसाळ्यात झालेला प्रचंड पाऊस, नंतरचा वादळ वाऱ्यांच्या तडाखा अशा अस्मानी आणि सुल्तानी संकटांनी शेतकरी बेजार झाला आहे. त्यात अशी संकटं आलीच तर त्याला आणखी हादरा बसतो.
Published on: 05 February 2022, 09:44 IST