राज्यात अनेक ठिकाणी सध्या बैलगाडा शर्यतीचे आयोजन केले जात आहे. बैलगाडा शर्यतीवरील बंदी उठवल्यानंतर अनेकांनी मोठा आनंद व्यक्त केला होता. असे असताना सध्या एक धक्कादायक घटना घडली आहेत. गेल्या महिन्यात रायगड जिल्ह्यातील बैलगाडा शर्यती दरम्यान झालेल्या अपघातात जखमी झालेल्या एका व्यक्तीचा मृत्यु झाला आहे. उमेश वर्तक असे त्यांचे नाव आहे. उमेश वर्तक हे अलिबाग पंचायत समितीचे सदस्य होते.
या घटनेमुळे संपूर्ण गावात हळहळ व्यक्त केली जात आहे. बैलगाडीच्या स्पर्धेत आपली गाडी पहिल्या नंबरवर असल्याचा आनंद उमेश वर्तक साजरा करत होते. असे असतानाच त्यांना दुसऱ्या बैलगाडीने धडक दिली. या अपघातात ते गंभीर जखमी झाले होते. यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. गेली महिनाभर त्यांच्यावर उपचार सुरु होते, पण त्यांचा मृत्यु झाला आहे. परिसरात त्यांची एक ओळख होती.
बैलगाडा शर्यत ही खुपच जिकरीची असते कारण बैलाला सांभाळणं हे सोपं काम नसतं. यामध्ये अनेक घटना घडतात, अनेकजण जखमी झाल्याच्या अनेक घटना घडल्या आहेत. रायगडमध्ये २ फेब्रुवारीला एका बैलगाडा शर्यतीचे आयोजन करण्यात आले होते. एक बैलजोडी थेट प्रेक्षकांच्या अंगावर गेली होती. त्यामुळे या अपघातात तीन जण जखमी झाले होते. या धक्कादायक घटनेचा व्हिडिओही समोर आला होता.
भाजपचे पदाधिकारी शैलेश काते यांनी या बैलगाडा शर्यतीचे आयोजन केले होते. त्यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांनी या शर्यतीचे आयोजन केले होते. त्यावेळी बैलगाडा शर्यत सुरु होताच, बैलांची एकजोडी लोकांच्या अंगावर गेली होती. यामुळे आता नुकत्याच या शर्यतीवरील बंदी उठवण्यात आली. मात्र अशा घटना घडत असल्याने याची चर्चा सुरु आहे.
महत्वाच्या बातम्या;
ज्यांनी ७ वर्ष धीर धरला आज ते झाले लखपती, रेशीम कोस उत्पादक शेतकरी मालामाल..
ब्रेकिंग! पडळकर खोत आता ऊस उत्पादकांसाठी मैदानात, सरकार एकरकमी FRP चा निर्णय घेणार?
अतिरिक्त ऊसाचा प्रश्न लागणार मार्गी! 'या' विभागातील मोठ्या 35 साखर कारखान्यांवर टाकली जबादारी
Published on: 24 March 2022, 12:35 IST