News

सध्या राज्यातील शेतकरी पुन्हा एकदा अडचणीत आले आहेत. राज्यात अनेक जिल्ह्यात गाई आणि म्हशींमध्ये लम्पी रोगाचा फैलाव वेगाने होत असल्याचे चित्र आहे. यामुळे शेतकरी आणि दूध उत्पादक हैराण झाला आहे. यामुळे प्रशासनाने यावर उपाय काढण्याची मागणी केली जात आहे.

Updated on 30 August, 2023 2:13 PM IST

सध्या राज्यातील शेतकरी पुन्हा एकदा अडचणीत आले आहेत. राज्यात अनेक जिल्ह्यात गाई आणि म्हशींमध्ये लम्पी रोगाचा फैलाव वेगाने होत असल्याचे चित्र आहे. यामुळे शेतकरी आणि दूध उत्पादक हैराण झाला आहे. यामुळे प्रशासनाने यावर उपाय काढण्याची मागणी केली जात आहे.

आता पुणे जिल्ह्यातील सात तालुक्यात जनावरांमध्ये लम्पीचा प्रादुर्भाव वाढला आहे. शिरुर, दौंड, खेड, आंबेगाव, हवेली, पुरंदर आणि मुळशी तालुक्यात पाळीव गाई वर्णीय जनावरांमध्ये लम्पीचे संक्रमण हाेऊ लागले आहे. यामुळे प्रशासनाने कठोर निर्णय घेतले आहेत.

लम्पीचे संक्रमण रोखण्यासाठी पुणे जिल्हाधिकारी यांच्याकडुन जनावरांची वाहतुक, जनावरांचा बाजार बंद ठेवण्याचा आदेश काढण्यात आला आहे. या आदेशात पुणे जिल्ह्यातील लम्पी संक्रमित सात तालुक्यात बैलगाडा शर्यतीवरही बंदी घालण्यात आल्याचे नमूद करण्यात आले आहे.

प्रकल्पग्रस्तांचे प्रश्न मार्गी लागणार, धोम, कण्हेर, कोयना व महु हातगेघर प्रकल्पग्रस्तांच्या प्रश्नाबाबत मोठा निर्णय..

याबराेबरच चाकण जनावरांचा बाजार ही बंद रहाणार आहे. पुण्याप्रमाणे सातारा, अकाेला जिल्ह्यात देखील लम्पीने शेतक-यांची झाेप उडवली आहे. प्रशासनाने या जिल्ह्यांमधील काही तालुक्यात जनावरांच्या वाहतुकीस निर्बंध लावले आहेत.

शेतकऱ्यांना आनंदाची बातमी! राज्य सरकारचा नमो शेतकरी योजनेचा पहिला हप्ता लवकरच वितरित होणार

पशूसंवर्धन विभागाने लसीकरण माेहिमेवर जाेर दिल्याची माहिती आहे. येणाऱ्या काळात परिस्थिती बघून निर्णय घेतले जाणार असल्याचे सांगितले गेले आहे.

कापूस सोयाबीन आणि इतर तेलबिया उत्पादकता विकासासाठी विशेष कृती योजना, 1 हजार कोटींना मंजुरी

English Summary: Bullock cart race closed in 'Ya' 7 talukas of Pune district! The administration's decision, the incidence of lumpy increased..
Published on: 30 August 2023, 02:13 IST