देशात केंद्रातील मोदी सरकार (Modi Government) वन डिस्ट्रिक्ट वन प्रॉडक्ट (One District One Product) राबवित आहे. ह्या योजनेद्वारे एका विशिष्ट जिल्ह्यासाठी एक पिकाची लागवडीला प्रोत्साहन देण्यात येणार आहे. आपल्या महाराष्ट्रात (Maharashtra) देखील ह्याची अंमलबजावणी होत आहे. ह्या योजनेमुळे शेतमालाला चांगला भाव मिळेल शिवाय निर्यात करण्यासाठी ह्याचा खुप मोठा फायदा होईल अशी आशा व्यक्त केली जात आहे.
महाराष्ट्रातील बुलढाणा जिल्ह्यासाठी देखील ह्या योजनेद्वारे पेरू पिकाची निवड करण्यात आली आहे. वन डिस्ट्रिक्ट वन प्रॉडक्ट (One District One Product) मुळे त्या विशिष्ट जिल्ह्यातील विशिष्ट पिकाला एक वेगळी ओळख निर्माण होईल तसेच त्या पिकाच्या निर्यातीसाठी शेतकऱ्यांना फायदा होईल, त्या पिकाला जास्त मागणी येईल आणि साहजिकच शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढेल. मिनिस्ट्री ऑफ फूड प्रोसेसिंग इंडस्ट्रीने (Ministry Of Food Processing Industry) आपल्या महाराष्ट्रातील बुलढाणा जिल्ह्यासाठी वन डिस्ट्रिक्ट वन प्रॉडक्ट अन्वये पेरू पिकाची निवड केली आहे, त्यामुळे जिल्ह्यातील पेरू उत्पादनाला चालना मिळणार आहे, तसेच पेरू उत्पादक शेतकऱ्यांना ह्याचा फायदा होणार आहे. महाराष्ट्रात फळबागांची लागवड ही लक्षणीय आहे, द्राक्षे, डाळिंब,संत्रा इत्यादी फळांची लागवड महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात केली जाते.
आणि अशातच वन डिस्ट्रिक्ट वन प्रॉडक्ट नुसार पेरू पिकाची बुलढाणासाठी झालेली निवड ही महत्वपूर्ण ठरणार आहे. ह्यामुळे बुलढाणा जिल्ह्यात पेरू लागवडीला (Guava Farming) चालना मिळेल आणि महाराष्ट्र पेरू लागवडीत आपले एक विशिष्ट स्थान निर्माण करेल.
पेरू हे फळबाग पिकांमध्ये एक महत्वाचे फळ आहे. ह्याची शास्त्रीय पद्धतीने लागवड करून शेतकरी चांगली मोठी कमाई करू शकतात. पेरू हे आरोग्यासाठी देखील खुप चांगले असल्याचे सांगितले जाते. पेरू मध्ये कॅलरी (Calories) कमी असते व फायबर (Fiber) जास्त असतो तसेच कोलेस्ट्रॉल (Colestrol) नगण्य असते. पारंपारिक पिकाला फाटा देऊन शेतकरी पेरू लागवडीतून चांगली कमाई करू शकतात.
पेरूच्या काही प्रमुख जाती/वाणी (Some Important Breeds Of Guava)
पेरूच्या काही संकरित जाती :-
व्हीएनआर बिही, अर्का अमूलिया, अर्का किरण, हिसार सफेदा, सफेद जॅम आणि कोहिर सफेद यांचा समावेश आहे.
एप्पल रंग, चित्तीदार, इलाहाबाद सफेद, लखनऊ-49, ललित, श्वेता, इलाहाबाद मृदुला, अर्का मृदुला, सीडलेस, रेड फ्लैश, पंजाब पिंक ह्या देखील जातींची लागवड केली जाते.
Published on: 20 October 2021, 07:19 IST