News

गेल्या काही दिवसांपासून राज्यातील शेतकरी महावितरण विरोधात आक्रमक झाले आहेत. अनेक ठिकाणी वीज तोडणी केली जात आहे तर काही ठिकाणी दिवस वीज मिळावी यासाठी आंदोलन सुरु आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटना शेतक-यांना दिवसा दहा तास वीज मिळावी,

Updated on 15 March, 2022 4:27 PM IST

गेल्या काही दिवसांपासून राज्यातील शेतकरी महावितरण विरोधात आक्रमक झाले आहेत. अनेक ठिकाणी वीज तोडणी केली जात आहे तर काही ठिकाणी दिवस वीज मिळावी यासाठी आंदोलन सुरु आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटना शेतक-यांना दिवसा दहा तास वीज मिळावी, या मागणीसाठी चांगलीच आक्रमक झाली आहे. राजू शेट्टी यांनी यासाठी कोल्हापूरमध्ये १० दिवस आंदोलन केले. त्यांनी राज्य सरकारला इशारा दिला आहे. आता त्यांनी वितरण कंपनीचे सर्व घोटाळे बाहेर काढणार असा इशारा दिला आहे.

राजू शेट्टी म्हणाले, सरकार फक्त आश्वासन देत आहे. त्यामुळे सरकारवर आम्ही शंभर टक्के विश्वास ठेवणार नाही. यापूर्वी सरकारने फसवले आहे. त्यामुळे जन आंदोलन उभे करून सरकारला गुडघे टेकायला लावणार असा इशारा शेट्टी यांनी दिला आहे. यामुळे पुन्हा एकदा शेट्टी विरुद्ध ठाकरे सरकार असा नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. यामुळे राज्य सरकार येणाऱ्या काळात काय निर्णय घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

शेतकऱ्यांना मोफत वीज देणे हा शेतकऱ्यांचा मुलभूत अधिकार आहे. परंतु, तो अधिकार शेतकऱ्याला मिळत नाही. शेतकऱ्याला सर्पदंश झाला तर साप वन्यजीव नाही म्हणून शेतकऱ्याला मदत मिळत नाही. शेतकऱ्याने सापाला मारले तर वन्यजीव मारला म्हणून शेतकऱ्यावर कारवाई होते, यामुळे शेतकऱ्यांनी करायचे तरी काय असा प्रश्न सध्या उपस्थित केला जात आहे. शेतकऱ्यांच्या जमिनी घेऊन त्यावर धरणे बांधली आणि विजनिर्मिती करण्यात आली.परंतु, याच शेतकऱ्यांना आज वीज मिळत नाही, असेही शेट्टी यांनी म्हटले आहे.

याबाबत सर्व माहिती गोळा करायचे काम सुरु असून या प्रकरणी न्यायालयात जाणार असल्याचेही शेट्टी यांनी म्हटले आहे. सहकार मंत्र्यांना काही स्टेटमेंट द्यायचे म्हटले तर त्यांना आधी बारामतीची परवानगी घ्यावी लागते. असेही म्हणत त्यांनी आता राज्य सरकारविरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे. यामुळे आता येणाऱ्या काळात काय होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

महत्वाच्या बातम्या:
'गोडतेल 67, पामतेल 61 मूगडाळ 45, उडीदाची डाळ 54 टक्क्यांनी महाग, गरिबांनी जगायचे कसे?'
शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश! वीज तोडणी त्वरीत थांबवण्याची ठाकरे सरकारची घोषणा, तोडलेली वीजही जोडणार
धरणाला भगदाड पडून कोसळली भिंत, शेतकरी भयभीत; मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता...

 




English Summary: built dams farmers' land generate electricity same farmers are not getting electricity today"
Published on: 15 March 2022, 04:27 IST