Union budget 2024 news : मोदी सरकार या पाच वर्षातील शेवटचा अंतरिम अर्थसंकल्प सादर करणार आहे. यामुळे या अर्थसंकल्पाकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत. या अर्थसंकल्पात नवीन घोषणा केल्या जात नाहीत. ज्या योजना सुरु आहेत त्यांना आर्थिक खंड येऊ नये म्हणून हा अर्थसंकल्प सादर केला जातो. मात्र तरीही या अर्थसंकल्पात शेती, उद्योग, बँक अशा विविध गोष्टींना जास्त प्राधान्य दिले जाण्याची शक्यता आहे.
१ फेब्रुवारी २०२४ रोजी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन अर्थसंकल्प सादर करणार आहेत. हा अर्थसंकल्प मोदी सरकारसाठी महत्त्वाचा मानला जात आहे. कारण अर्थसंकल्प जाहीर झाल्यानंतरच काही दिवसांत लोकसभेच्या निवडणुका जाहीर होण्याची शक्यता आहे. यामुळे या अर्थसंकल्पातून सर्वसामान्य, शेतकरी, नोकरदार वर्ग यांना मोठं गिफ्ट मिळाण्याची शक्यता व्यक्त जात आहे.
मोदी सरकारचा अंतरिम अर्थसंकल्प
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यावर्षी केंद्राचे अंतरिम बजेट सादर करणार आहेत. तुम्हाला आता वाटत असेल अंतरिम बजेट नेमकं काय?. आता हा प्रश्न तुमच्या मनात नक्कीच आला असेल की, बजेट नियमितपणे मांडले जाते, मग यावेळी अंतरिम अर्थसंकल्प का मांडणार? तर चला या लेखाच्या माध्यमातून आज आपण ते जाणून घेऊयात. अंतरिम अर्थसंकल्पाचा अर्थ काय आणि तो का सादर केला जातो? हे सविस्तर या लेखाच्या माध्यमातून पाहूयात.
या वर्षी एप्रिलमध्ये लोकसभेच्या निवडणुका होणार आहेत. तुमच्या माहितीसाठी आम्ही तुम्हाला सांगतो की ज्या वर्षी लोकसभेच्या निवडणुका होणार असतात त्यावर्षी अर्थमंत्री देशाचा अंतरिम अर्थसंकल्प सादर करतात. अंतरिम अर्थसंकल्प सादर केल्यानंतर आधीपासून सुरू असलेल्या योजनांमध्ये आर्थिक समस्या निर्माण होऊ नयेत आणि त्याचवेळी देशाच्या अर्थव्यवस्थेला कोणतीही हानी पोहोचू नये म्हणून हा अर्थसंकल्प सादर केला जातो.
अंतरिम अर्थसंकल्पात नवीन योजना राबविल्या जात नाहीत. आधीच सुरू असलेल्या योजनांसाठीच निधी दिला जातो. हा अर्थसंकल्प वर्षभराऐवजी वर्षातील काही महिन्यांसाठीच सादर केला जातो. अंतरिम अर्थसंकल्प केवळ दोन महिन्यांसाठी सादर केला जातो. तथापि आवश्यक असल्यास त्याची वेळ मर्यादा वाढविली जाऊ शकते. तर संपूर्ण अर्थसंकल्प किंवा त्याऐवजी सर्वसाधारण अर्थसंकल्प संपूर्ण वर्ष डोळ्यासमोर ठेवून सादर केला जातो.
अर्थसंकल्प नेमका काय असतो?
अंतरिम अर्थसंकल्प एक असतो आणि दुसरा सर्वसाधारण अर्थसंकल्प असतो. अंतरिम अर्थसंकल्प हा फक्त काही महिण्यासाठी असतो. तर दुसरा सर्वसाधारण अर्थसंकल्प सादर करताना संपूर्ण वर्षभराचा विचार केला जातो. अर्थमंत्र्यांनी सादर केलेला सर्वसाधारण अर्थसंकल्प किंवा पूर्ण अर्थसंकल्प १ एप्रिल ते ३१ मार्च या आर्थिक वर्षाचा आर्थिक तपशील देतो. या अर्थसंकल्पात सरकार देशातील जनतेसाठी नवनवीन योजना, अन्य योजना जाहीर करते. या अर्थसंकल्पात आरोग्य सेवा, शिक्षण, पायाभूत सुविधांचा तपशील समाविष्ट आहे. संपूर्ण अर्थसंकल्पाचा उद्देश देशाची आर्थिक स्थिती सुधारणे आणि मजबूत करणे हा असतो. तसंच संपूर्ण देशाचा आणि नागरिकांचा विचार करुन हा अर्थसंकल्प सादर केला जातो.
Published on: 30 January 2024, 02:54 IST