News

हिवाळी अधिवेशन ३१ डिसेंबरला सुरु होत आहे. या अधिवेशनात केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण 1 फेब्रुवारी रोजी देशाचा अर्थसंकल्प सादर करणार आहेत. अर्थसंकल्पातून शेतकऱ्यांना आणि शेती क्षेत्राला खूप अपेक्षा आहेत.

Updated on 25 January, 2022 3:40 PM IST

Budget 2022 : हिवाळी अधिवेशन ३१ जानेवारीला सुरु होत आहे. या अधिवेशनात केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण (Nirmala Sitharaman) 1 फेब्रुवारी रोजी देशाचा अर्थसंकल्प (Union Budget) सादर करणार आहेत. अर्थसंकल्पातून शेतकऱ्यांना आणि शेती क्षेत्राला खूप अपेक्षा आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 2015 मध्ये शेतकऱ्यांचे उत्पन्न 2022 पर्यंत दुप्पट करण्याचे जाहीर केले होते.

शेती क्षेत्रासाठी नव्या तंत्रज्ञानाला प्रोत्साहन देण्यासाठी सरकार पावले उचलण्याची शक्यता आहे. भारतात छोट्या शेतकऱ्यांनी संख्या सर्वाधिक आहे. इंडिया इन्फोलाइनच्या रिपोर्टमध्ये येत्या अर्थसंकल्पात छोट्या शेतकऱ्यांसाठी कर्जाची सुविधा आणखी योग्य बनवण्यासाठी सरकार लक्ष घालणार आहे, त्यामुळे हि प्रक्रिया अधिक सोपी होईल. पीक विमा योजना शेतकऱ्यांच्यासाठी आणखी सोयीचे आणि त्याच्यामध्ये विस्तार करण्याबाबत घोषणा होऊ शकते.

ठिबक सिंचन आणि लिफ्ट इरिगेशन यासारख्या सुविधांवर सरकार भर देऊन सिंचन क्षेत्र वाढविण्यासाठी प्रयत्न करणार आहे. त्याचबरोबर, कर सवलत, कमी व्याजदरावर कर्ज अशा प्रकारच्या घोषणा देखील सरकार करू शकते. मोबाईल माती परिक्षण, शीतगृह,वाहतूक आणि गोदाम यासाठी देखील सरकार मोठ्या तरतुदी करु शकते. जैविक शेतीकडे शेतकऱ्यांचा कल वाढतो आहेत.

सरकार विविध पिकांच्या शेतीला प्रोत्साहन देण्याचे काम करत आहे. शेतकऱ्यांचं यूरियावरील अवलंबित्व कमी करण्यासाठी केंद्राकडून योजना जाहीर होऊ शकते. अर्थसंकल्पात शेतकऱ्यांना कमी व्याज दरावर कर्ज, शेती क्षेत्रासाठी नवतंत्रज्ञान, कृषी पायाभूत सुविधा, वेगवेगळी पिके, यूरिया वरील अवलंबित्व कमी करणे या सारख्या मुद्द्यावर निर्णय होणार आहे.

English Summary: Budget 2022: Will these things be available for small farmers in the budget?
Published on: 25 January 2022, 02:29 IST