Budget 2022 : अर्थसंकल्पात काय स्वस्त होणार, काय महागणार याकडे सगळ्यांचे लक्ष आहे. या अर्थसंकल्पाकडून सर्वसामान्यांच्या खूप मोठ्या अपेक्षा आहेत. महागाईच्या झळा सर्वसामान्यांनी आगोदरच खूप सोसल्या आहेत. या अर्थसंकल्पात सामान्यांना दिलासा देणाऱ्या घोषणा होऊ शकतात. यंदाच्या अर्थसंकल्पात काय स्वस्त होईल, काय महागणार याकडे अनेकांचे लक्ष लागले आहे. महागाईतून सावरताना सर्वसामान्यांना मोठी कसरत करावी लागत आहे.
पेट्रोल-डिझेल
पेट्रोल-डिझेलच्या वाढलेल्या दरामुळे सामान्यांमध्ये नाराजीचे वातावरण आहे. पेट्रोल-डिझेलच्या दराने शंभरी गाठली आहे. यंदाच्या अर्थसंकल्पात सरकारकडून उत्पादन शुल्कात कपात करण्याची शक्यता आहे.
एलपीजी गॅस सिलेंडर दर
केंद्र सरकारने उज्जवला योजनेतंर्गत मोफत गॅस सिलेंडर दिले. मात्र, गॅसचे दर एक हजार रुपयांच्या आसपास गेल्याने घराचे बजेट कोलमडले आहे. यामुळेआता स्वयंपाकासाठीच्या एलपीजी गॅस दराकडे लक्ष असणार आहे. महागाईतून सावरताना सर्वसामान्यांना मोठी कसरत करावी लागत आहे.
गेल्या अर्थसंकल्पात कापूस, प्लास्टीक, ऑटो पार्ट्स, मोबाइल फोन, चार्जर, आयात करण्यात आलेले कपडे, एलईडी बल्ब, मद्य महागले होते. तर, नायलॉनचे कपडे, लोखंड, स्टील, तांब्याच्या वस्तू, सोने, चांदी आणि प्लेटिनमसारख्या वस्तू स्वस्त झाल्या होत्या.
सर्वसामान्यांचा या अर्थसंकल्पाकडून मोठ्या अपेक्षा आहेत. पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर यंदाचा अर्थसंकल्प सादर होत आहे.
Published on: 01 February 2022, 10:17 IST