Budget 2022 : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारमण (Finance Minister Nirmala Sitharaman) यंदाचा अर्थसंकल्प (Union Budget 2022 ) सादर केले. अर्थसंकल्पात शेतकऱ्यांसाठी अनेक घोषणा करण्यात आल्या आहेत. शेती क्षेत्रासाठी १५ महत्वाच्या घोषणा करण्यात आल्या आहेत.
शेती क्षेत्रासाठी महत्वाच्या घोषणा
1. कृषी विद्यापीठ अभ्यासक्रमात बदलासाठी राज्यांना प्रोत्साहन
2. रसायनमुक्त नैसर्गिक शेतीला (chemical free farming) देशभरात प्रोत्साहन देणार
3. पीक पाहणीसाठी तंत्रज्ञानाच्या वापराला प्राधान्य (crop assessment)
4. ड्रोनद्वारे किटकनाशक आणि खतांची फवारणी
5. प्रकल्पाद्वारे नऊ लाख हेक्टर शेती सिंचनाखाली येणार (irrigation of farmland)
6. गव्हाची सरकारी खरेदी - 1208 लाख टन
7. शेतकऱ्यांना डिजिटल आणि हायटेक सेवा देण्याचे लक्ष्य (digital and hightech services for farmers)
8. शेतकरी उत्पादक संस्था, भाडेतत्वावरील शेती, तंत्रज्ञानासाठी (FPOs) निधी मिळण्याची सोय केली जाणार
9. नैसर्गिक शेती, झीरो बजेट, आणि सेंद्रिय शेतीचा हवा समावेश (natural farming, zero budget farming, organic farming)
10. पाच नदीजोड प्रकल्पांच्या ब्लुप्रिंटला मान्यता
11. 'नाबार्ड' अंतर्गत सह-गुंतवणूक निधी उभारणीस पाठबळ (NABARD)
12. परतापी-नर्मदा, गोदावरी-कृष्णा, कृष्णा-पेन्नार, पेन्नार-कावेरी या नद्या जोडल्या जाणार
13. देशांतर्गत तेलबिया निर्मिती वाढवण्यासाठी योजना (increasing domestic production of oilseeds)
14. ॲग्री स्टार्टअप्स आणि ग्रामीण उद्योगांसाठी निधीचा वापर (agri startups)
15. कृषी आधारित नव्या उद्योगाना कर्ज
Published on: 01 February 2022, 05:01 IST