News

Budget 2022 : अर्थमंत्री निर्मला सीतारमण आज देशाचा अर्थसंकल्प करीत आहेत. कोविड संकट ओसरत असताना कोरोनामुक्तीचा अर्थसंकल्प अर्थमंत्री सादर करत आहेत.

Updated on 01 February, 2022 11:57 AM IST

Budget 2022 : अर्थमंत्री निर्मला सीतारमण आज देशाचा अर्थसंकल्प करीत आहेत. कोविड संकट ओसरत असताना कोरोनामुक्तीचा अर्थसंकल्प अर्थमंत्री सादर करत आहेत. मंदीतून सावरणा-या अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी अर्थसंकल्पातून विविध घोषणांची अपेक्षा आहे.

५ नदी जोड प्रकल्पांची घोषणा करण्यात आली आहे. यामध्ये तापी नर्मदा, कृष्ण पेन्नार, गोदावरी कृष्णा, दमनगंगा नदी जोड प्रकल्प केला जाणार आहे. पिण्याच्या पाण्याच्या प्रकल्पांसाठी 60000 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. ईशान्येकडील राज्यांच्या विकासासाठी 1500 कोटींची तरतूद करण्यात आली आहे. ५ नदी जोड प्रकल्पाचा डीपीआर तयार केला आहे. ६८ लाख लोकांसाठी पेयजल योजना राबण्यात येणार आहे.

नोकरदार,उद्योजक, शेतकरी, आरोग्य क्षेत्रासाठी अर्थसंकल्प कसा राहणार हे पाहायला लागणार आहे. कोरोना संकटामुळे देशाची अर्थव्यवस्था खालावली आहे. ती आगामी आर्थिक वर्षांतील (२०२२-२३) संभाव्य आव्हानांना सामोरे जाण्याइतकी मजबूत केली जाणार आहे.

English Summary: Budget 2022: 5 river connection projects announced in the budget
Published on: 01 February 2022, 11:57 IST