News

पिल्ले देणाऱ्या शोभिवंत मासे यांचे प्रजजन आणि संवर्धन करून, आपण नविन व्यवसाय चालू करू शकतो. पैदास झालेले पिल्ले यांना मोठे करून ते शोभिवंत मासे पाळणारे किरकोळ विक्रेते यांना आपण विकू शकतो.

Updated on 26 September, 2023 3:30 PM IST

श्रीतेज सिद्धार्थ यादव, जयंता सु.टिपले

वाढती लोकसंख्या व त्यामुळे झालेले शहरीकरण असल्या धावत्या युगात आपण छंद म्हणून शोभिवंत मत्स्यपालन याची सीमा पार ओलांडून गेली आहे. फोटोग्राफी नंतर जगातील सर्वात जुना आणि दुसरा सर्वात लोकप्रिय छंद अशी या व्यवसायाची ओळख आहे. या व्यवसायामध्ये शोभिवंत मासे पाळणारे किरकोळ विक्रेते, निर्यात व टाकीला लागणारे साहित्य पुरवणारे मोठे व्यापारी, संशोधक आणि अलीकडचे संवर्धन करते अश्या लोकांचा समावेश आहे. हा व्यवसाय कोलकाता, चेन्नई आणि मुंबई या शहरातून पूर्ण भारतभर पसरत चालला आहे. भारतात विविध ठिकाणी आता घरातील आजू बाजूच्या परसबागेमध्ये मध्ये शेततळे करून त्यामध्ये शोभिवंत मासे पाळले जातात. घरातील सजावट म्हणून सुद्धा काचेच्या विविध आकाराच्या टाकीमध्ये मासे पाळले जातात. या कारणामुळे शोभिवंत मासे पालन या कृषी व्यवसाला प्रेरणा मिळत आहे.

पिल्ले देणाऱ्या शोभिवंत मासे यांचे प्रजजन आणि संवर्धन करून, आपण नविन व्यवसाय चालू करू शकतो. पैदास झालेले पिल्ले यांना मोठे करून ते शोभिवंत मासे पाळणारे किरकोळ विक्रेते यांना आपण विकू शकतो. या प्रकारच्या मासे यांचे संगोपन करणे थोडे सोपे असल्यामुळे या कामात जास्त वेळ द्यावा लागत नाही.

 गप्पी मासे
हा मासा गोड्या पाण्यातील आहे व ह्या मासाच्या विविध प्रकारच्या प्रजाती आढळतात. तर वेगळे शेपुट चे प्रकार आणि आकर्षक नक्षीदार रंग व वर्ण वैशिष्ट्ये लक्षात घेऊन ठराविक पैदास केलेलं प्रजाती सुद्धा बाजारात आले आहेत.
• लांबी ३ से. मी
• आयुष्य काळ २ ते ५ वर्ष
• गरोदर काळ २० ते ३० दिवस

 मॉली मासे
हे मासे पाण्यातील विविध परिस्थितीला राहते. जसे की खाऱ्या आणि गोडया पाण्याला सहन करू शकतात. त्यामुळे यांची काळजी घेणे सोपे आहे. ह्या मासाच्या विविध प्रकारच्या जाती आहेत व ते सुंदर आकर्षक रंगाच्या दिसतात.
• लांबी ४ ते १३ से. मी
• आयुष्य काळ ३ ते ५ वर्ष
• गरोदर काळ ४० ते ८० दिवस


 प्लेटी मासे
हे मासे गोडया पाण्यातील आहेत. हे मासे मॉली सारखेच दिसतात पण वेगळी प्रजाती आहे. ह्या माश्याचे पोट निमुळते असते व लांबी सुध्दा कमी असते. शिवाय ह्या प्रकारामध्ये काही नर माश्यांना शेपटीला खालच्या बाजूला तलवारी सारखे वाढीव टोक असते. त्यालाच स्वऑर्ड टेल असे म्हणनतात.
• लांबी ३ ते ६ से. मी
• आयुष्य काळ ३ ते ४ वर्ष
• गरोदर काळ २५ ते ५० दिवस

पिल्ले आधीच पूर्णपणे तयार झालेल्या माशांच्या स्वरूपात जन्माला येतात. पहिल्या महिन्यात पिल्लांना दिवसातून चार ते पाच वेळा कृत्रिरीत्या तयार केलेले पावडर पौष्टिक अन्न द्यावे किंवा जिवंत खाद्य जसेकी अर्टिमिया, डफनिया, मोनिया द्यावे त्यामुळे ४ ते ५ आठवड्यांनी रंग येण्यास सुरवात होती.
पिल्ले देणाऱ्या शोभिवंत माशांचे व्यवस्थापन मधील अर्थशास्त्र:-
अनु.क्र. विषयवस्‍तु किंमत (रुपयांमध्ये)
I. खर्च
A. स्थिर भांडवल
1. प्रजनन टाकी (4’ x 2.5’ x 1’, सिमेंटची, 4 नग)- 12,000
2. पालन टाकी (4’ x 2’ x 2’, सिमेंटची, 4 नग)- 11,200
3. ब्रूड स्टॉक टाकी (4’ x 2.5’ x 2’, सिमेंटची, 2 नग)- 6,400
4. लार्व्‍हांची टाकी (2’ x 1.5” x 1’, सिमेंटची, 8 नग)-14,400
5. ऑक्सीजन (प्राणवायू) पंप- 4,000
6. प्राणवायू (ऑक्सीजन) सिलेंडर त्याच्या साधनांसह (1 नग)- 5,000
7. सच्छिद्र प्लास्टिक प्रजनन बास्केट (20 नग रु. 80 दराने)- 1,600
एकूण खर्च 54,600

B. अस्थिर किंमत
1. 200 माद्या, 100 नर (रु. 1.5/नग; गप्पी) 200 माद्या, 100 नर (रु. 2.5/नग मॉली) 200 माद्या, 100 नर (रु.5 /नग स्वॉर्डटेल) आणि 200 माद्या,100 नर (रु.3.5/नग प्लॅटीसाठी)- 3,750
2. खाद्य (150 किलो/वर्ष, रु. 30/किलो दराने)- 4,500
3. वेगवेगळ्या आकाराची जाळी- 1,500
4. वीज/इंधन (रु. 350/महिना)- 4,200
5. इतर खर्च- 2,000
एकूण (रु.)- 15,950
C. एकूण किंमत
1. अस्थिर किंमत- 15,950
2. स्थिर भांडवलावर व्याज (13% प्रतिवर्ष)- 7,098
3. अस्थिर किंमतीवर व्याज (13% दर सहा महिन्याने)- 2,073
4 घसारा (स्थिर किंमतीच्या 18% )- 9,828
सर्व बेरीज (रु.)- 34,949
II. निव्वळ उत्पन्न
1. एक महिना वाढविलेल्या 19,200 नग गप्पी माशांची रु. 1 दराने विक्री (40 नग/मादी/चक्र दराने 3 चक्र/वर्ष आणि जगण्याचा दर 80%)- 19,200
2. एक महिना वाढविलेल्या 19,200 नग मॉली माशांची रु. 1.5 दराने विक्री (40 नग/मादी/चक्र दराने 3 चक्र/वर्ष आणि जगण्याचा दर 80%)- 28,800
3. एक महिना वाढविलेल्या 19,200 नग स्वॉर्डटेल माशांची रु. 1.5 दराने विक्री (40 नग/मादी/चक्र दराने 3 चक्र/वर्ष आणि जगण्याचा दर 80%)- 28,800
4. एक महिना वाढविलेल्या 19,200 नग प्लॅटी माशांची रु. 1.5 दराने विक्री (40 नग/मादी/चक्र दराने 3 चक्र/वर्ष आणि जगण्याचा दर 80%)- 28,800
एकूण (रु.)- 1,05,600
III. एकूण उत्पन्न (निव्वळ उत्पन्न- एकूण किंमत) (रु.)-70,651 
वरील दिलेल्या आर्थिक किंमती मध्ये चढ उतार होऊ शकतो. कारण या व्यवसायाचे आपण कसं व्यवस्थापन करतो त्यावर ह्या किंमती अवलंबून असणार आहेत. यामध्ये प्रामुख्याने टाकीची रचना जसे की आपण इथे प्लास्टिक टाकी किंवा अगदी जमिनीमध्ये खड्डे करून त्यावर टारपोलिन हाथरून त्यामधे माश्याचे संगोपन करू शकतो. तसेच बाजारमध्ये यांना लागणार खाद्य व यांची असलेली किंमत ही सुध्दा कमी जास्त असू शकते.
लेखक - श्रीतेज सिद्धार्थ यादव, विद्यार्थी, मो. न.८८०६३३३७६०, जयंता सु. टिपले, सहाय्यक प्राध्यापक (अतिथी व्याख्याता), जलीय प्राणी आरोग्य व्यवस्थापन विभाग, मो. न. ८७९३४७२९९४. मत्स्य विज्ञान महाविद्यालय, उदगीर, जि. लातूर. महाराष्ट्र.

 

English Summary: Breeding and economics of juvenile ornamental fishes
Published on: 26 September 2023, 03:30 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)