News

शेतकऱ्यांनी आपला भाजीपाला कितीही चांगल्या पद्धतीने पिकवला तरी त्याला त्याचा भाव ठरवता येत नाही. यामुळे शेतकऱ्यांचा मोठा तोटा होतो. व्यापारीच त्याला बाजारभाव देतात आणि तोच भाव त्याला मान्य करावा लागतो, असे असताना आता जळगाव जिल्ह्यात असलेल्या एरंडोल कृषी उत्पन्न बाजार समितीने ज्वारी आणि मका खरेदीला हमीभाव देण्याचा निर्णय घेतला आहे.

Updated on 25 January, 2022 12:24 PM IST

शेतकऱ्यांनी आपला भाजीपाला कितीही चांगल्या पद्धतीने पिकवला तरी त्याला त्याचा भाव ठरवता येत नाही. यामुळे शेतकऱ्यांचा मोठा तोटा होतो. व्यापारीच त्याला बाजारभाव देतात आणि तोच भाव त्याला मान्य करावा लागतो, असे असताना आता जळगाव जिल्ह्यात असलेल्या एरंडोल कृषी उत्पन्न बाजार समितीने ज्वारी आणि मका खरेदीला हमीभाव देण्याचा निर्णय घेतला आहे. त्याची अंमलबजावणीही सुरू केली आहे. त्यामुळे आता शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. असा निर्णय आता राज्यातील इतर बाजार समित्यांनी घेतला पाहिजे असे शेतकऱ्यांनी म्हटले आहे. अनेकदा आपण बघतो शेतकऱ्यांचा माल खरेदी देखील होत नाही, यामुळे तो खराब होतो.

यामुळे खरेदी न होणे आणि चांगला भाव न मिळणे ही शेतकऱ्यांसमोरील सर्वात मोठी समस्या आहे. एरंडोल कृषी उत्पन्न बाजार समितीने दोन आठवड्यांपासून यासाठी नोंदणी सुरू आहे. आता खरेदीही सुरू झाली आहे. शेतकऱ्यांना त्यांच्या मालाला योग्य भाव मिळावा, यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. यामुळे येथील शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले आहे. आता शेतकऱ्यांना त्यांच्या ज्वारी आणि मका पिकाला योग्य भाव मिळणार आहे. शेतकऱ्यांना थेट खरेदी केंद्रावर शेतमाल न आणता प्रथम नोंदणी करावी लागणार आहे. यासाठी आता शेतकरी देखील सहकार्य करत असल्याचे दिसून येत आहे.

तसेच ऑनलाइन नोंदणीच्या वेळी शेतकऱ्यांना आधार कार्डची माहिती द्यावी लागेल. गेल्या काही दिवसांपासून ऑनलाइन नोंदणी सुरू झाल्यापासून आतापर्यंत 407 शेतकऱ्यांनी मक्यासाठी नोंदणी केली आहे. याचा फायदा एरंडोल व धरणगाव तालुक्यातील शेतकऱ्यांना होणार आहे. अनेकांनी याबाबत इच्छा व्यक्त केली होती. अखेर याबाबत निर्णय घेण्यात आला आहे. भाव नसल्याने मका आणि ज्वारीचे पीक अनेक शेतकरी घेत नव्हते, यामुळे याचे उत्पादन कमी होण्याची शक्यता होती. आता अशा निर्णयामुळे ही पिके घेण्याकडे शेतकऱ्यांचा कल वाढणार आहे.

असे असले तरी इतर पिकांना देखील असा भाव दिला गेला पाहिजे. सध्या एरंडोल उपसमितीत कृषी मालाची खरेदी-विक्री सुरू आहे. अन्य मंडईंमध्येही असा उपक्रम राबविल्यास शेतकऱ्यांचा महत्त्वाचा प्रश्न मार्गी लागेल. मात्र राज्य आणि केंद्र स्थरावर तसा निर्णय होणे गरजेचे आहे. कांदा उत्पादक शेतकऱ्यांनाही हमीभाव हवा आहे. तसेच इतर शेतकऱ्यांना देखील असा भाव मिळाला तर शेतकरी सुखी होईल.आता त्यांची ही मागणी कधी पूर्ण होते हे येत्या काळात स्पष्ट होईल.

English Summary: Breaking! The market committee took a big decision in the interest of the farmers, now the farmers will get a guarantee (2)
Published on: 25 January 2022, 12:24 IST