जम्मू-काश्मीर, दिल्लीला भूंकपाचे तीव्र धक्के बसले आहेत. जम्मू-काश्मीरमधील काश्मीर खोरे आणि जम्मूतील संभागमध्ये शनिवारी भूकंपाचे तीव्र धक्के बसले आहेत. यामुळे सगळीकडे भीतीचे वातावरण पसरले आहे. भूंकपाचे तीव्र धक्के जाणवल्यावर जमीन वेळ हालत होती. त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले.
भूंकपाचे झटके जाणवताच लोकांनी घराबाहेर धाव घेतली. दिल्ली-एनसीआरमधील नोएडामध्येही भूकंपाचे धक्के जाणवले. जम्मूमधील अनेक जिल्ह्यातही भूकंपाचे धक्के जाणवले. काश्मीर खोऱ्यातही भूकंपाचे धक्के जाणवले गेले.
दिल्ली, जम्मू-काश्मीर, उत्तराखंड, पंजाबसह उत्तर भारतात आज सकाळी भूकंपाचे तीव्र झटके जाणवले. आज सकाळी पावणे दहाच्या सुमारास हे भूकंपाचे धक्के जाणवले. या भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर 5.9 इतकी होती. या भूकंपाचा केंद्रबिंदू अफगाणिस्तानातील हिंदूकुश येथे होता.
भूंकपात जीवितहानी नाही
लहान मुलं आणि ज्येष्ठ नागरिकांनाही तात्काळ घराबाहेर काढण्यात आलं. अचानक धरणी हल्ल्याने अनेक लोक घाबरलेले दिसत होते. भूकंपाचे धक्के बसल्यानंतरही अनेक लोक भीतीपोटी बराच वेळ घराबाहेरच आहेत. जम्मू-काश्मीरमध्ये भूकंपाचे सर्वाधिक धक्के जाणवले. मात्र, या भूकंपाच्या धक्क्यामुळे कोणतीही जीवित वा वित्तहानी झाली नसल्याचं वृत्त आहे. भूकंपाचे धक्के बसतात अनेकांच्या घरातील सामान खाली पडले. भांडीकुंडी जमिनीवर पडले. मात्र, या धक्क्यांमुळे भिंतींना तडे गेले नाहीत. किंवा कोणतेही मोठे आर्थिक नुकसान झालेलं नाही. तसेच कोणतीही जीवित हानी झाली नाही, असं सूत्रांनी सांगितलं.
Published on: 05 February 2022, 02:54 IST