News

राज्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांसाठी ठाकरे सरकारने एक मोठा निर्णय घेतला आहे. ऊस उत्पादक शेतकऱ्यांना 200 रुपयांचं अनुदान देण्याचा निर्णय घेऊन दिलासा दिला आहे. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा घेण्यात आला आहे. यामुळे सरकारी तिजोरीवर ताण आला असला तरी शेतकऱ्यांना मात्र यामुळे दिलासा मिळणार आहे.

Updated on 29 April, 2022 10:45 AM IST

राज्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांसाठी ठाकरे सरकारने एक मोठा निर्णय घेतला आहे. ऊस उत्पादक शेतकऱ्यांना 200 रुपयांचं अनुदान देण्याचा निर्णय घेऊन दिलासा दिला आहे. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा घेण्यात आला आहे. यामुळे सरकारी तिजोरीवर ताण आला असला तरी शेतकऱ्यांना मात्र यामुळे दिलासा मिळणार आहे.

याबाबत माहिती अशी की रिकव्हरी रेट जिथे 10 टक्क्यांच्या खाली असेल तिथले ऊस उत्पादक यासाठी प्रयत्न असणार आहेत. ऊस वाहतूक 50 किलोमीटरपेक्षा जास्त असेल तर प्रति किलोमीटर 5 रुपयांचं अनुदानसुद्धा राज्य सरकारच्या मार्फत देण्यात येणार आहे. यामुळे याचा शेतकऱ्यांना फायदा होणार आहे. सध्या अनेक शेतकऱ्यांचे ऊस अजूनही तोडले गेले नाहीत.

राज्यामध्ये अतिरिक्त ऊसाचा प्रश्न सध्या निर्माण झाला आहे, याच पार्श्वभूमीवर राज्य सरकारने हा निर्णय घेतला आहे. अनेक कारखाने बंद होण्याच्या मार्गावर आहेत. मात्र ऊस तोडले गेले नसल्याने वजनात घट होऊन शेतकऱ्यांचे नुकसान होणार आहे. यामुळे आर्थिक झळ ही शेतकऱ्यांना बसत आहे. हा प्रश्न मिटावा यासाठी शासन स्तरावर वेगवेगळ्या प्रकारचे प्रयत्न केले जात आहेत.

या अतिरिक्त उसाचा प्रश्न वरून शेतकरी पुरते कोंडीत सापडले असून शेतातील ऊस कसा सुटेल हा सगळ्यात मोठा प्रश्न ऊस उत्पादकांसमोर आहे. या मंत्रिमंडळ बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे होते. या निर्णयामुळे आता शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे. गेल्या काही दिवसांपासून ऊस उत्पादक शेतकरी अनेक अडचणींचा सामना करत आहेत.

महत्वाच्या बातम्या;
ICICI, HDFC आणि SBI बँकेने आपल्या ग्राहकांना दिली गुड न्युज, जाणून घ्या काय आहे खास?
उत्तर प्रदेश सरकारकडून शेतकऱ्यांना उच्चांकी ऊस बिल, शेतकऱ्यांना दिलासा...
अखेर महिंद्रा बोलेरो आलीच! आता रोड कसलाही असुद्या वेग तसाच राहणार..

English Summary: Breaking! Rs 200 grant from Thackeray government to sugarcane growers, relief to farmers
Published on: 29 April 2022, 10:45 IST