सध्या राजकारणातील सर्वात मोठी बातमी समोर आली आहे. यामुळे एकच चर्चा सुरू झाली आहे. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे पुण्यातून निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याची शक्यता आहे. यामुळे राजकीय चर्चा रंगू लागल्या आहेत.
मोदींसाठी पुणे लोकसभा मतदारसंघाची चाचपणीसुद्धा झाल्याची माहिती मिळत आहे. पीएम मोदी पुण्यातून निवडणूक लढवण्यासाठी भाजपकडून चाचपणी केली असल्याचे राजकीय सुत्रांनी म्हटले आहे.
तसेच पीएम मोदी यांनी पुण्यातून लढवणे हे भाजपसाठी सोपे मानले जात आहे. काही सर्व्हेक्षणातून भाजपची महाराष्ट्रात पिछेहाट होण्याची शक्यता असल्याचे समोर आल्यानंतर भाजपकडून वेगवेगळे प्रयत्न केले जात आहे.
अजितदादा शब्दाला पक्के! माळेगाव साखर कारखान्याने दिला राज्यात सर्वाधिक 3411 रुपये दर..
जर पीएम मोदी पुण्यातून लढले तर पुणे, पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्यावर त्याचा प्रभाव जाणवेल. अशी रणनिती भाजपने आखली असल्याचे सुत्रांचे म्हणणे आहे.
पीएम मोदी यांनी याआधी गुजरात आणि उत्तर प्रदेशमधून लोकसभा निवडणूक लढवली होती. आता ते पुण्यातून निवडणूक लढवू शकतात, असे सुत्रांनी म्हटले आहे. यामुळे आता येणाऱ्या काळात काय घडणार हे लवकरच समजेल.
काळ्या हळदीपासून मोठी कमाई, जाणून घ्या त्याचे औषधी गुणधर्म..
2024 मध्ये राज्यात कोण होणार मुख्यमंत्री.? लोकांच्या मनातला सर्वात मोठा सर्वे आला समोर...
राज्यात हातभट्टी मुक्त गाव अभियान राबविणार, मंत्री शंभूराज देसाई यांची माहिती
Published on: 01 September 2023, 01:19 IST