News

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी Nitin Gadkari पश्चिम बंगालमधील सिलीगुडी येथे एका कार्यक्रमाला उपस्थित राहिल्यानंतर आजारी पडले. कार्यक्रम संपल्यानंतर गडकरींनी अस्वस्थतेची तक्रार केली. यावेळी डॉक्टर उपस्थित होते.

Updated on 17 November, 2022 4:06 PM IST

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी Nitin Gadkari पश्चिम बंगालमधील सिलीगुडी येथे एका कार्यक्रमाला उपस्थित राहिल्यानंतर आजारी पडले. कार्यक्रम संपल्यानंतर गडकरींनी अस्वस्थतेची तक्रार केली. यावेळी डॉक्टर उपस्थित होते.

गडकरींना Nitin Gadkari दार्जिलिंगचे खासदार राजू बिश्त यांच्या निवासस्थानी नेण्यात आले. बिश्त हे देखील कार्यक्रमाला उपस्थित होते. गडकरी सध्या बंगालच्या दौऱ्यावर आहेत. त्यांनी सिलीगुडी येथे 1206 कोटी रुपयांच्या तीन राष्ट्रीय महामार्ग प्रकल्पांची पायाभरणी केली.

काही वेळाने ते बरे होऊन आपल्या गाडीतून निघून गेले. कार्यक्रमात मंचावरच त्यांना भोवळ आल्याची माहिती आहे. पश्चिम बंगालमध्ये कार्यक्रम सुरु असताना मंचावरच त्यांना भोवळ आली आणि त्यांची तब्येत बिघडली. आधी सु्द्धा त्यांना अशा प्रकारे कार्यक्रमात अनेकदा भोवळ येऊन तब्येत बिघडली आहे.

आता बिअर कडू लागणार नाही, येणार स्वादिष्ट बिअर...

यानंतर गडकरींवर डॉक्टरांनी उपचार केले. गडकरी हे एक कार्यक्षम मंत्री आहेत. अनेक ठिकाणी त्यांनी वेगवेगळे प्रयोग करून विकासाची कामे केली आहेत. केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री म्हणून ते सध्या काम करत आहेत.

ब्रेकिंग! केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या बंगल्यावर हातोडा, कोर्टाच्या आदेशानंतर निर्णय

शरीरातील साखरेची पातळी (Sugar Level) कमी झाल्यामुळे नितीन गडकरी यांची प्रकृती खालावली असल्याचं डॉक्टरांकडून सांगण्यात येत आहे. सध्या नितीन गडकरी यांची प्रकृती ठीक असल्याचं डॉक्टरांनी सांगितलं. पश्चिम बंगालच्या सिलीगुडीमध्ये सरकारी योजनांचं उद्घाटन करण्यासाठी नितीन गडकरी उपस्थित होते. 

महत्वाच्या बातम्या;
उस दरासाठी आता दिवसेंदिवस शेतकरी आक्रमक होताना दिसत आहेत
शेतकऱ्यांनो शेअर्सवरील साखरेच्या मोहापाई हजारो रुपयांचे नुकसान का करुन घेता?
राजू शेट्टींनी रस्ता केला आणि 2 कॅन दुधाचे झाले 16 कॅन दूध, गावकऱ्यांच्या वैभवात पडणार भर

English Summary: Breaking! Nitin Gadkari's health deteriorated
Published on: 17 November 2022, 04:06 IST