News

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते माजी गृहमंत्री अनिल देशमुख गेल्या अनेक दिवसांपासून जेलमध्ये आहेत. 1 नोव्हेंबर 2021 ईडी चौकशीसाठी गेलेल्या देशमुख यांना ईडीकडून अटक करण्यात आली. ईडीने देशमुखांवर भ्रष्टाचाराचा गुन्हा दाखल केला होता.

Updated on 27 December, 2022 3:02 PM IST

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते माजी गृहमंत्री अनिल देशमुख गेल्या अनेक दिवसांपासून जेलमध्ये आहेत. 1 नोव्हेंबर 2021 ईडी चौकशीसाठी गेलेल्या देशमुख यांना ईडीकडून अटक करण्यात आली. ईडीने देशमुखांवर भ्रष्टाचाराचा गुन्हा दाखल केला होता.

ईडीने अटक केल्यानंतर आर्थिक गैरव्यवहार प्रकरणात सीबीआकडूनही त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. त्यामुळे देशमुख एकाच वेळी दोन तपास यंत्रणांकडून दोन गुन्ह्यांप्रकरणी अटकेत होते. असे असताना आता त्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

सीबीआयने पुन्हा एकदा त्यांच्या कोठडीत वाढ करण्याची मागणी केली होती. पण न्यायालयाने ती फेटाळून लावत त्यांच्या सुकटेचा मार्ग मोकळा केला आहे. यामुळे त्यांना दिलासा मिळाला आहे.

इलेक्ट्रिक कारच्या किमती नवीन वर्षात वाढणार, जाणून घ्या कारण..

मागील महिन्यात अनिल देशमुखांना ईडीच्या प्रकरणात उच्च न्यायालयाने जामीन मंजूर केला होता. मात्र सीबीआयच्या प्रकरणात देशमुखांना जामीन मिळणं बाकी होतं. त्यानंतर 12 डिसेंबर रोजी उच्च न्यायालयाने सीबीआयच्या प्रकरणातही अनिल देशमुखांना सशर्त जामीन मंजूर केला.

आता शेतकऱ्यांना फक्त मिस कॉल आणि मेसेज द्वारे मिळेल कृषी लोन, करा फक्त 'हे' काम..

परंतु त्याच दिवशी जामीनाला दहा दिवसांची स्थगिती देखील दिली. आता मात्र मुंबई उच्च न्यायालयाने अनिल देशमुख यांना अखेर दिलासा दिला आहे. यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसला मोठा दिलासा मिळाला आहे.

महत्वाच्या बातम्या;
शेतकऱ्यांनो तुम्हाला शेळ्यांच्या 'या' जाती माहिती आहेत का? देतात फायदेशीर उत्पादन..
गायरान जमिनीवर शेती करणाऱ्यांच्या नावे सातबारा करा, गायरान हक्क परिषदेत मागणी
India Post Recruitment 2023: तरुणांनो लागा कामाला! टपाल विभागात 98 हजारांहून अधिक पदांची भरती..

English Summary: Breaking! NCP leader Anil Deshmukh come out jail tomorrow
Published on: 27 December 2022, 03:02 IST