सध्या दरवाढीचे सत्र सुरूच आहे. त्यात आता दुधाच्या किमतीत वाढ करण्यात आली आहे. हे दरवाढ गोव्यात करण्यात आली आहे.
मागील महिन्यात महाराष्ट्रात गायीबरोबरच म्हशीच्या दूध दरात वाढ झाली होती.आता गोव्यातील गोवा डेअरी दुधाच्या दरात वाढ झाली असून एका लिटरमागे 4 रुपयांनी ही वाढ झाली आहे. अर्थातच या दर वाढीमुळे उत्पादकांना याचा चांगलाच फायदा होणार आहे.
2 मे पासून या दरवाढीच्या नियमांची अमलबजावणी करण्यात येणार होती मात्र अचानक ही दरवाढ रविवारपासून म्हणजेच 1 मे ला लागू करण्यात आली. त्यामुळे विक्रेत्यांनी नाराजी व्यक्त केली शिवाय त्यांची तारांबळ उडाल्याने विक्रेत्यांच्या रोषालाही त्यांना सामोरे जावे लागले. उत्पादकांना मोठा दिलासा मिळालेला असून ही वाढ तब्बल ४ रुपयांनी केल्याने समाधान व्यक्त केलं जात आहे.
2 मे पासून गोवा डेअरी दूधाच्या दरात वाढ करण्याचा निर्णय झाला खरा मात्र अंमलबजावणीवरुन गोंधळ उडाला. २ मे पासून या निर्णयाला मान्यता देण्यात आली होती मात्र अचानक अचानक 1 मे पासूनच हा निर्णय घेण्यात आला. दूध पिशवीवर जुनेच दर होते असल्याने किरकोळ विक्रेत्ये पैसे वाढवून मागत आहेत असा ग्राहकांचा गैरसमज देखील झाला. यातून ग्राहक आणि किरकोळ विक्रेत्ये यांच्यामध्ये वादही झाले.
दुधाची 4 रुपयांनी वाढ झाली असली तरी उत्पादकांना मात्र, 2 रुपये लिटरमागे वाढ मिळणार आहे. त्यामुळे उत्पादकही समाधानी आहे. मात्र, ग्राहकांना अचानक झालेली ही वाढ रुचली नाही. त्यामुळे दरवाढीच्या पहिल्याच दिवशी मोठा गोंधळ पहायला मिळाला. दुधाच्या मागणीच्या तुलनेत गोव्यामध्ये दुधाचे तेवढे उत्पादन होत नाही. राज्याला अधिक दुधाची गरज आहे.
गोव्यामध्ये सध्या साधारण 54 ते 55 हजार लिटर दुधाचे संकलन करण्यात येते. राज्यात दुधाचा पाठपुरवठा कमी पडत असल्याने त्याची गरज भागवण्यासाठी गोव्याबाहेरील दूध डेअऱ्यांवर अवलंबून राहावे लागते. आणि म्हणूनच सरकारचे दूध उत्पादनात वाढ करण्याच्या अनुशंगाने प्रयत्न सुरु आहेत. दुधाच्या दरात वाढ झाल्याने आता दूध व्यवसायामध्ये वाढ होईल अशी शक्यता दर्शवली जात आहे.
महत्वाच्या बातम्या;
ऐकावं तेवढं नवलंच! या इसमाने तयार केला 'इको फ्रेंडली टी पॅक', आता चहाच्या पाकिटातूनही रोप उगवेल
Breaking: आंतरराष्ट्रीय बाजारात खतांचे दर वाढले; देशात 'या' खताची टंचाई भासू लागली
बातमी महत्वाची! शेतकऱ्यांना मिळणार कुंपणासाठी अनुदान,जाणून घ्या 'या' योजनेबद्दल
Published on: 01 May 2022, 04:53 IST