News

NA land : जमिनीचे प्रामुख्याने दोन प्रकार पडतात एक म्हणजे एग्रीकल्चरलं म्हणजे कृषिक आणि दुसरी म्हणजे नॉन अग्रिकल्चरल अर्थातचं अकृषिक. कृषिक जमिनीचा वापर हा शेतीसाठी होतो आणि अकृषीक जमीनीचा रहिवासी प्रयोजनासाठी तसेच विकास कामांसाठी किंवा शेती सोडून इतर कामासाठी होतो हे आपणास ठाऊकच आहे.

Updated on 25 December, 2022 10:45 AM IST

जमिनीचे प्रामुख्याने दोन प्रकार पडतात एक म्हणजे एग्रीकल्चरलं म्हणजे कृषिक आणि दुसरी म्हणजे नॉन अग्रिकल्चरल अर्थातचं अकृषिक. कृषिक जमिनीचा वापर हा शेतीसाठी होतो आणि अकृषीक जमीनीचा रहिवासी प्रयोजनासाठी तसेच विकास कामांसाठी किंवा शेती सोडून इतर कामासाठी होतो हे आपणास ठाऊकच आहे.

आता जमिनी संदर्भात पुणे जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाची अशी माहिती समोर येत आहे. पुणे जिल्ह्याचे जिल्हाधिकारी डॉक्टर राजेश देशमुख यांनी जिल्ह्यातील प्रत्येक गावातील गावठाणपासून 200 मीटर अंतराच्या आत असलेली जमीन एन ए म्हणजेच नॉन अग्रिकल्चरल करण्याचे आवाहन केले आहे.

म्हणजेच आता पुणे जिल्ह्यातील गावठाण पासून 200 मीटर अंतराच्या आत असलेली जमीन विकास नियंत्रण नियमांच्या अधीन राहून निवासी प्रयोजनासाठी नॉन अग्रिकल्चरल वापरासाठी रुपांतरीत केली असल्याचे मानण्यात येणार आहे. आणि ही जमीन रहिवासी प्रयोजनासाठी घोषित करण्यात येणार असल्याचे जिल्हाधिकारी यांनी नमूद केले आहे.

केंद्रीय कर्मचाऱ्यांना नवीन वर्षात तिप्पट बोनस, जाणून घ्या काय मिळणार?

जमीन भोगवटादार वर्ग-२ धारणाधिकाराची जर असेल तर अशा जमिनीच्या मानीय अकृषिक रूपांतरणापोटी देय नजराणा द्यावा लागेल आणि इतर शासकीय देणी भरावी लागतील यानंतर सदरची जमीन ही अकृषिक म्हणजे नॉन एग्रीकल्चरल होणार आहे.

गावठाणपासून 200 मीटर अंतराच्या आत असलेली जमीन नॉन अग्रिकल्चरल करण्यासाठी आवश्यक ती रक्कम भरल्यानंतर जमीन नॉन एग्रीकल्चरल होणार आहे. यामुळे संबंधित जमिनीवर नागरिकांना घर बांधणे किंवा यांसारख्या इतर विकास कामांचे परियोजन करण्यासाठी सोयीस्कर होणार आहे.

केंद्रीय कर्मचाऱ्यांना नवीन वर्षात तिप्पट बोनस, जाणून घ्या काय मिळणार?

जर जमीन नॉन ऍग्रीकल्चरल करायची असेल तर त्यासाठी काही दस्ताऐवज लागत असतात. मात्र पुणे जिल्ह्यात गावठाण पासून 200 मीटर अंतराच्या आत असलेल्या अशा जमिनीचे एनए करण्यासाठी कोणत्याच कागदपत्रांची गरज राहणार नसल्याचे सांगितले जात आहे.

या ठिकाणी आम्ही नमूद करू इच्छितो की, संबंधितांनी रक्कम भरण्याच्या दिनांकापासून 60 दिवसाच्या आत जमीन ऑन अग्रिकल्चरल बनण्याची जी प्रोसेस आहे ती पूर्ण होईल. म्हणजे 60 दिवसानंतर जमीन ही नॉन अग्रिकल्चरल युजसाठी उपयोगात आणली जाऊ शकणार आहे. पुणे जिल्हा अधिकाऱ्यांनी जिल्ह्यातील अधिकाधिक शेतकरी बांधवांना तहसील कार्यालयात अर्ज करून जमीन नॉन अग्रिकल्चरल करण्याचे आवाहन केले आहे.

English Summary: Breaking : Farmers will have to NA the land; A new rule has arrived
Published on: 25 December 2022, 10:45 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)