कोरोना महामारीमुळे देशात गेल्या वर्षी जनगणना झाली नाही. भारतात दर दहा वर्षांनी जनगणना केली जाते. यापूर्वी ही प्रक्रिया कागदपत्राद्वारे करण्यात आली होती. मात्र आता केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी जनगणना प्रक्रिया डिजिटल करण्यात येणार असल्याची घोषणा केली आहे. गृह मंत्रालयाने जनगणना प्रक्रिया अधिक शास्त्रोक्त करण्यासाठी आधुनिक तंत्रांचा समावेश करण्याचा निर्णय घेतला आहे.
ही प्रक्रिया डिजीटल केल्यास मोजणी प्रक्रिया आणखी सोपी होईल. एवढेच नाही तर जन्म-मृत्यू नोंदवही याला जोडण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. यामुळे देशातील प्रत्येक जन्म आणि मृत्यूनंतरची जनगणना आपोआप अपडेट होईल. गृह मंत्रालयाने जनगणना प्रक्रिया सुलभ करण्यासाठी आधुनिक तंत्राचा वापर करण्याचा निर्णय घेतला आहे.
आसाममध्ये डिरेक्टोरेट सेन्सस ऑपरेशन्स इमारतीच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. देशाच्या विकासासाठी अद्ययावत जनगणनेच्या महत्त्वावर त्यांनी भर दिला. “पुढील जनगणना ई- जनगणना असेल. जी १०० टक्के परिपूर्ण जनगणना असेल. या जनगणनेच्या आधारे पुढील २५ वर्षांच्या देशाच्या विकासकामांचे नियोजन केले जाईल,” ते म्हणाले.
विविध कारणांसाठी जनगणना खूप महत्त्वाची आहे. आसामसारख्या राज्यात तर ते अधिक महत्त्वाचे आहे. आसाम हे लोकसंख्येच्या दृष्टीने सर्वात संवेदनशील राज्य आहे,” असेही शाह म्हणाले. जन्म आणि मृत्यू नोंदी देखील संबंधित जनगणना प्रक्रियेशी जोडल्या जातील. त्यामुळे बाळाच्या जन्मानंतर त्याचा तपशील जनगणना नोंदवहीमध्ये आपोआप जोडला जाईल.
संबंधित मुलाचे वय १८ वर्षे पूर्ण झाल्यानंतर त्याचे नाव मतदार यादीत समाविष्ट केले जाईल आणि मृत्यूनंतर त्याचे नाव यादीतून वगळण्यात येईल. संबंधित व्यक्तीचे नाव आणि पत्ता बदलणेही सोपे होणार आहे. म्हणजे तुमची जनगणना आपोआप अपडेट होईल, असे अमित शाह म्हणाले.
महत्वाच्या बातम्या
राहिबाई पोपेरे यांनी सेंद्रीय शेतीचा आदर्श जनमाणसात पोहचवला : शरद पवार
Published on: 10 May 2022, 04:01 IST